
Multibagger Stocks | शेअर बाजारात हजारो स्टॉक ट्रेड करत आहेत, त्या पैकी एक चांगला स्टॉक शोधून काढणे सोपे काम नाही. असाच एक धमाकेदार स्टॉक शेअर बाजारातील तज्ञांच्या नजरेत आला आहे. आपण ज्या शेअर बद्दल बोलत आहोत तो शेअर Elecon Engineering Company चा आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, हा शेअर 564.98 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जर आपण फक्त ऑगस्ट महिन्याबद्दल बोललो, तर इलेकॉन च्या शेअर्स नी सध्या 362.38 चे लक्ष्य पार केले आहे. आणि आता ह्या शेअर्स नी पुढील लक्ष्य किमतीकडे वाटचाल सुरू केली आहे. पुढील लक्ष किंमत 404.09 रुपये आहे.
52 आठवड्यांचा उच्चांक :
अवघ्या फक्त 6 महिन्यांत, Elecon Engineering Company Ltd च्या शेअर्स नी आपल्या भागधारकांना तब्बल अडीच पट परतावा दिला आहे. हा स्टॉक मागील 6 महिन्यांपूर्वी 149.15 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 373.95 रुपयांपर्यंत गेला आहे. ह्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 393.95 रुपये असून आणि नीचांक किंमत 128.05 रुपये आहे.
बाजारातील तज्ज्ञांच्या मते, चालू वर्षात हा शेअर 564.98 रुपयांपर्यंत सहज जाऊ शकतो. जर आपण फक्त ऑगस्ट महिन्याबद्दल बोललो, तर इलेकॉनने 362.38 रुपयेचे निर्धारित लक्ष्य गाठले आहे. आणि सध्या ह्या स्टॉक ने आपल्या दुसऱ्या लक्ष्य किमती कडे वाटचाल सुरू केली आहे. पुढील लक्ष किंमत 404.09 रुपये निर्धारित करण्यात आली आहे.
मागील ट्रेडिंग सेशन मध्ये Elecon चा शेअर 360.10 वर उघडला होता.आणि 373.95 रुपयेवर पोहोचला होता. 17 ऑगस्ट 2022 रोजी दिवसा अखेर Elecon शेअरची किंमत 356.70 वर बंद झाली होती. आणि हे पाहता 203.31 रुपयांच्या स्टॉपलॉससह दीर्घ काळासाठी बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत. आणि 295.84 च्या स्टॉपलॉससह अल्प काळासाठी बिनधास्त खरेदीची शिफारस तज्ञांनी केली आहे.
Elecon शेअर ची कामगिरी :
मागील 5 दिवसांत या शेअर्स ने आपल्या भागधारकांना 6.62 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याचबरोबर या शेअर्सने फक्त एका महिन्यात 16.24 टक्के आणि मागील 6 महिन्यांत 149 टक्के परतावा देऊन आपल्या भागधारकांना मालामाल केले आहे. चालू वर्षात आतापर्यंत या स्टॉक ने 93.98 टक्के परतावा दिला आहे. तर मागील 5 वर्षांत आपल्या भागधारकांना 638 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.