
Multibagger Stocks | प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली आहे. संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यामध्ये गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे नाव आघाडीवर आहे.
मागील 6 महिन्यांत प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आज बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर 2023 रोजी प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 1,294.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित घसरण पाहायला मिळत आहे. प्रीमियर एक्स्प्लोसिव्ह कंपनीने आपले सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.
या कालावधीत कंपनीने 11.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही काळात प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड कंपनीने 2.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजेच वार्षिक आधारावर प्रीमियर एक्स्प्लोसिव्ह कंपनीच्या निव्वळ नफ्यात 346 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रीमियर एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये 1246.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात प्रीमियर एक्सप्लोझिव्ह लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 25 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.