
Multibagger Stocks | चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड ही शेअर बाजारात सूचीबद्ध एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 2,340.27 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक आणि वित्तीय सेवा पुरवण्याचा उद्योग करते. फायनान्स कंपनी चॉईस इंटरनॅशनल लिमिटेडने आपल्या पात्र भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याची घोषणा केली आहे. कंपनी बोनस शेअर 1:1 या प्रमाणात वितरीत करेल. याचा अर्थ कंपनी प्रत्येक विद्यमान शेअर एक बोनस शेअर मोफत देईल. बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट 23 सप्टेंबर असेल, आधी घोषणा कंपनीने केली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार कंपनी लवकरच आपल्या पात्र गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देईल. त्यानुसार, बोनस इक्विटी शेअर्स 1:1 च्या प्रमाणात वितरीत केले जातील. त्यास पात्र असलेल्या सदस्यांची नावे निश्चित करण्यासाठी कंपनीने 23 सप्टेंबर 2022 रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केली आहे.
स्टॉकची कामगिरी :
चॉईस इंटरनॅशनल कंपनीचा शेअर 0.09 टक्के वाढून 470.35 रुपये किमतीवर पोहोचला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये स्टॉकची किंमत 469.95 रुपये होती. मागील 4 दिवसात स्टॉकमध्ये 7 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. या स्टॉकने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 386.15 टक्के परतावा मिळवून दिला आहे. गेल्या दहा वर्षांत दिलेला परतावा 1126.47 टक्के पेक्षा अधिक होता. गेल्या तीन वर्षांत या स्टॉकने कमालीची कामगिरी केली आहे. स्टॉकने आपल्या भागधारकांना या काळात 1050 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी, स्टॉकने गेल्या एका वर्षात आपल्या भागधारकांना 236.71 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
8 एप्रिल 2022 रोजी शेअर बाजारातील NSE निर्देशांकावर, चॉईस इंटरनॅशनल कंपनीच्या स्टॉकने 481 रुपयांची किंमत पातळी गाठली होती. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 481 रुपये आहे. स्टॉक ची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 297 रुपये होती. चॉईस इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी लघु भांडवल गटात मोडणारी कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल 2,340.27 कोटी रुपये आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या आर्थिक आणि वित्तीय सेवा सुविधा पुरवण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.