 
						Multibagger Stocks | आपण ज्या कंपनीच्या शेअर्स बद्दल चर्चा करता आहोत तो आहे इंडो अमाइन्स कंपनीचा. इंडो अमाइन्स च्या शेअर्सनी मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. या शेअर्स नी आपल्या मागील सर्व जुने रेकॉर्ड तोडले आहेत. बीएसईवर कंपनीचे शेअर्स 176 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर जाऊन पोहोचले आहेत.
कोविड-19 नंतर, भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात मल्टीबॅगर स्टॉकचा उत आला आहे. इंडो अमाइन्स हा देखील या मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक शेअर आहे ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा देऊन या कंपनीने आपले सर्व जुने विक्रम मोडीत काढले. बीएसईवर कंपनीच्या शेअर्सनी 176 रुपयांची सर्वकालीन किंमत पातळी गाठली आहे. कंपनीच्या मागील दोन वर्षांच्या कामगिरीवर एक नजर टाकू
कंपनीची कामगिरी :
एप्रिल 2020 मध्ये, इंडो अमाईन्सचा एक शेअर फक्त 14 रुपयेवर ट्रेड करत होता. 24 ऑगस्ट 2022 रोजी शेअरची किंमत 176 रुपयांच्या पातळीवर पोहोचली आहे. म्हणजेच या दोन वर्षांसाठी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1150 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअरची किंमत 97 रुपयांवर ट्रेड करत होतो ती आता 176 रुपयांपर्यंत गेली आहे. एका महिन्यात कंपनीच्या शेअरच्या किंमतीत तब्बल 70 टक्क्यांपर्यंत वाढली झाली आहे. मागील 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर कंपनीच्या शेअरची किंमत 90 रुपयावर ट्रेड करत होती ती आता वाढून 176 रुपयांच्या किमतीवर पोहोचली आहे. यादरम्यान शेअरच्या किमतीत सुमारे 85 टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल ते जून या काळात कंपनीच्या भागधारकांनाही मोठया नुकसानीला सामोरे जावे लागले होते. यादरम्यान कंपनीच्या शेअरची किंमत जी 100 रुपयांवर ट्रेड करत होती, त्यात घसरण होऊन 75 रुपयांपर्यंत खाली आली आहे.
मागील तीन वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, या मल्टीबॅगर स्टॉकची किंमत 31 रुपयांवरून 176 रुपयांपर्यंत वाढलेले दिसेल. म्हणजेच, या कंपनीने आपल्या पोझिशनल भागधारकांना 475 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. दहा वर्षांपूर्वी या कंपनीच्या एका शेअरची किंमत फक्त 4.75 रुपये होती. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअरची किंमत 176 रुपयांच्या पातळीवर गेली आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या शेअर वर पैसे लावले असते तर तुम्हाला आतापर्यंत 3600 टक्के परतावा मिळाला असता. कंपनीच्या शेअर ची 52 आठवड्यांची उच्चांक पटली किंमत 176 रुपये आहे. तर बीएसईमध्ये 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 70.25 रुपये आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 1113 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		