
Multibagger Stocks | शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी खूप कमी कालावधीत आपल्या भागधारकांना छप्पर फाड परतावा मिळवून दिला आहे. आज आम्ही तुम्हाला टाटा समूहातील अशा एका जबरदस्त शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने खूप कमी कालावधीत फक्त एक लाख गुंतवणुकीवर दिला आहे दीड कोटी रुपयांचा भरघोस परतावा.
टाटा समूह शेअरः
शेअर बाजार दीर्घकाळापासून चढ-उताराच्या चक्रातून जात आहे. घसरणीच्या काळातही असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अजिबात निराश केले नाही. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यासाठी संयम असणे आवश्यक आहे असे सांगितले जाते. जर तुमच्याकडे कौशल्य नसेल तर शेअर बाजारातून तुम्ही रिकाम्या हाती परतणार हे नक्की. या व्यवसायाच्या मदतीने तुम्ही छोटी गुंतवणूक करून लाखो रुपये आणि लाखांचे करोडो रुपयांत सहज रूपांतर करू शकता. 2021 आणि 2022 या वर्षात अनेक कंपनीच्या शेअर्सनी बंपर परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. अनेक शेअर्स गुंतवणूकदारांनी काही पैशांमध्ये खरेदी केलेले शेअर्स, आता हजारो रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत. आज या लेखात आपण टाटा समूहाच्या अशा शेअरबद्दल माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.
हा शेअर तब्बल 8,835 रुपये किमतीच्या पातळीवर जाऊन पोहोचला आहे. टाटा समूहाची कंपनी टाटा एल्क्सीच्या शेअरने आपले गुंतवणूकदारांना इतका जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे की गुंतवणूकदार अक्षरशः करोडपती झाले आहेत. ज्यांनी या स्टॉकमध्ये फक्त एक लाख रुपये गुंतवले होते, ते लोक आज करोडपती झाले आहेत. 8 मे 2009 रोजी बीएसईवर टाटा अलेक्सीच्या शेअरची किंमत फक्त 59.20 रुपये होती. 8 सप्टेंबर 2022 रोजी ट्रेडिंग हा स्टॉक तब्बल 8,800 किमतीवर जाऊन पोहोचला आहे.
52 आठवड्यांचा नीचांक 3532 रुपये :
Tata Elxsi कंपनीचा स्टॉकमधील 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 4,821 रुपये आहे. त्याच वेळी, या स्टॉकची उच्चांक पातळी किंमत 10,760 रुपये आहे. टाटा समूहाच्या या शेअर्सनी मागील 13 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 15000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 2009 साली या स्टॉकमध्ये फक्त एक लाख रुपये गुंतवले असते आणि तुमची गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती, तर आज तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर तब्बल दीड कोटी रुपये नफा मिळाला असता.
59.20 रुपये ते 8,835 रुपयांपर्यंतचा प्रवास :
8 मे 2009 रोजी टाटा समूहातील या शेअरची किंमत फक्त 59.20 रुपये होती. 8 सप्टेंबर 2022 रोजी शेअर ची किंमत वाढून तो तब्बल 8,822 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील पाच वर्षांतच हा स्टॉक 681.25 रुपयांवरून 8,800 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मागील एका वर्षात स्टॉकने 4,864.15 रुपये वरून 8,835 रुपयांपर्यंत उसळी घेतली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.