30 November 2023 5:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | मार्ग श्रीमंतीचा! हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत मिळेल 32 टक्क्यांपर्यंत परतावा Penny Stocks | पटापट हे टॉप 3 पेनी शेअर्स सेव्ह करा, 1 महिन्यात 147 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतोय Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स पुन्हा तेजीत, शेअर्समधील तेजी कायम राहणार का? तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! मल्टिबॅगर शेअरने 5 दिवसांत दिला 22 टक्के परतावा, पैसा वेगात वाढतोय Gold Rate Today | अरे देवा! आजही सोन्याचे भाव मजबूत वाढले, लग्नकार्याच्या दिवसात सोन्याचा दर किती महाग होणार? Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करतोय, 10 महिन्यांत दिला 150% परतावा, शेअरची किंमत उच्चांकी पातळीवर Aster DM Share Price | 1 दिवसात 20 टक्के परतावा देणाऱ्या एस्टर डीएम हेल्थकेअर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, नेमकं कारण काय?
x

Multibagger Stocks | फक्त एका दिवसात 20 टक्के परतावा दिला, प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज शेअर्सची खरेदी अचानक वाढली

Multibagger Stocks

Multibagger Stocks | प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज या प्लास्टिक उत्पादन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज या कंपनीचे शेअर्स किंचित विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रिन्स पाईप्स कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 749 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक एवढी वाढ सप्टेंबर 2023 तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केल्याने पाहायला मिळत आहे. Prince Pipes Share Price

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 624.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज गुरूवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज स्टॉक 1.33 टक्के घसरणीसह 711.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 759.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 517 रुपये होती. प्रिन्स पाईप्स कंपनीने मागील वर्षी याच तिमाहीत 24.11 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता. जुलै-सप्टेंबर 2023 तिमाहीत प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज कंपनीने 656 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

मागील वर्षीच्या सप्टेंबर 2022 तिमाहीत प्रिन्स पाईप्स कंपनीने 636 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. सप्टेंबर 2023 तिमाहीत प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज कंपनीने तयार मालाचे प्रमाण वार्षिक आधारावर 8 टक्के नोंदवले होते.

चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2023 तिमाहीत प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज कंपनीने 70.63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 178 रुपये जाहीर केली होती. स्टॉक लिस्टिंग झाल्यापासून प्रिन्स पाईप्स कंपनीचे शेअर स्थिर गतीने वाढत आहेत. आतापर्यंत प्रिन्स पाईप्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 305 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात प्रिन्स पाईप्स कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्के वाढली आहे. 2023 या वर्षात प्रिन्स पाईप्स अँड फिटिंग्ज स्टॉक 25 टक्के वाढला आहे. तर IPO इश्यू किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 300 टक्के वाढला आहे. डिसेंबर 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 166.6 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Prince Pipes Share Price NSE 09 November 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(414)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x