
Multibagger Stocks | आज आम्ही तुम्हाला अश्या एका शेअर बद्दल माहिती देणार आहोत, ज्यात एक लाख गुंतवणुकीचे 33 लाख झाले आहेत.11 मे 2007 रोजी या कंपनीचा शेअर 19.70 रुपये वर ट्रेड करत होता. 29 जुलै रोजी दुपारी 3:30 वाजता कंपनीच्या एका शेअरने 654.80 रुपये वर पोहोचून एक नवीन उच्चांक स्थापन केला आहे. म्हणजेच या 15 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 3223.86 टक्के वाढ झाली आहे.
शेअर बाजाराबाबत गुंतवणूक केल्यानंतर संयम राखणे खूप आवश्यक आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने फंडामेंटल्स पाहून एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर आज ना उद्या तो शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणारच हे नक्की. असेच काहीसे स्मॉल कॅप कंपनी श्री रायलसीमा हाय-स्ट्रेंथ हायपो लिमिटेडच्या शेअर्समध्ये दिसून आले आहे. कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे एक लाख रुपये 33 लाख रुपयेमध्ये परिवर्तित केले आहेत.
श्री रायलसीमा हाय-स्ट्रेंथ हायपो कंपनीचा इतिहास :
11 मे 2007 रोजी कंपनीचा शेअर 19.70 रुपयेवर ट्रेड करत होता. 29 जुलै रोजी बाजारात बंद होताना कंपनीच्या एका शेअरची किंमत 654.80 रुपयेवर पोहोचली होती. म्हणजेच या 15 वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये 3223.86% वाढ झाली आहे. मे 2007 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी ह्या स्टॉक मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असेल, त्याचा परतावा आता 33.23 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे. जर आपण मागील पाच वर्षांचा विचार केला तर 4 ऑगस्ट 2017 रोजी कंपनीचा शेअर 131 रुपयेवर ट्रेड करत होता. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स 399.85 टक्के वधरले आहे. पाच वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता परतावा म्हणून 5 लाख मिळाले आहेत.
गेल्या वर्षभरातही कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदाराना जबरदस्त परतावा दिला आहे. श्री रायलसीमा हाय-स्ट्रेंथ हायपो लिमिटेडच्या स्टॉकनी या कालावधीत गुंतवणूकदारांना 89.96% परतावा मिळवून दिला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमध्येही या स्टॉकने गुंतवणूकदारांना 92.05 टक्के इतका जबरदस्त परतावा दिला आहे. त्याच वेळी, या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त एका महिन्यात 57.86% ची वाढ पाहायला मिळत आहे.
शेअर बाजारात कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 669.00 रुपये होता आणि 24 ऑगस्ट 2021 रोजी 52 आठवड्यांचा नीचांक 274 रुपये होता. म्हणजेच, कंपनीचे शेअर्स त्यांच्या 52 आठवड्यांच्या नीचांक पातळीवरून 138% वधारून व्यापार करत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.