15 December 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Tata Group Share | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करतोय, टायटन शेअरने 101000% परतावा दिला, शेअर आजही खरेदीला टॉप

Tata Group Share

Tata Group Share | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्सने नवीन विक्रमी उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. टायटन कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी 3044 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले होते. दिवसा अखेर स्टॉक 3024.95 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टायटन कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 1827.15 रुपये होती. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी देखील टायटन कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते.

गुंतवणुकीवर 101000 टक्के परतावा

23 मे 2003 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 2.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3024.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 101408 टक्के मजबूत झाली आहे. जर तुम्ही 23 मे 2003 रोजी टायटन कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10.1 कोटी रुपये झाले असते.

15 वर्षात 5600 टक्के परतावा

मागील 15 वर्षात टायटन कंपनीच्या शेअरची किंमत 5615 टक्के वाढली आहे. 20 जून 2008 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 53.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 जून 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 3024.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 20 जून 2008 रोजी टायटन कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 57.02 लाख रुपये झाले असते.

मार्च 2023 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार दिवंगत गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे 46945970 शेअर्स म्हणजेच 5.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे डिसेंबर 2022 तिमाही पर्यंत टायटन कंपनीचे 45895970 शेअर्स होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Group Share Titan Share Price Today on 29 June 2023.

हॅशटॅग्स

Tata Group Share(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x