Multibagger Stocks | ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सन NSE वर 10,170.00 रुपये प्रति शेअर या जबरदस्त किमतीला स्पर्श केला आहे. कंपनीचे शेअर्स 10,015.35 रुपयेच्या आधीच्या किमतीच्या तुलनेत 1.54 टक्के अधिक किमतीवर जाऊन बंद झाले होते.
मल्टीबॅगर स्टॉक रिटर्न:
ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लि. कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना करोडपती बनवले आहे. ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया लिमिटेडच्या शेअर्सनी NSE वर 10,170.00 रुपये प्रति शेअर या किमतीला स्पर्श केला आणि भागधारकांमध्ये आनंदी आनंद पसरला. ते 10,015.35 रुपयेच्या आधीच्या किमतीच्या तुलनेत 1.54 टक्के अधिक किमतीवर गेला आहे. या मल्टीबॅगर स्टॉकने मागील 14 वर्षांत आपल्या भागधारकांना तब्बल 3,297.36 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
शेअर किंमत इतिहास :
ZF कमर्शिअल व्हेईकल कंट्रोल सिस्टीम इंडिया शेअरची किंमत 3 ऑक्टोबर 2008 रोजी 299.35 रुपये वरून 10,015.35 रुपये पर्यंत वाढली आहे. म्हणजेच, जर तुम्ही 14 वर्षांपूर्वी ZF च्या कमर्शियल शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुम्हाला आता तब्बल 33.97 लाख रुपये इतका भरघोस परतावा मिळाला असता.
मागील पाच वर्षांत स्टॉकमध्ये तब्बल 66.57 टक्के आणि मागील वर्षाच्या तुलनेत 39.15 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 2022 मध्ये स्टॉक आतापर्यंत 21.13 टक्के वार्षिक दर प्रमाण आधारावर वाढला आहे. 08 सप्टे 2022 रोजी NSE वर या स्टॉकने 10,222.95 रुपयेच्या आपल्या 52आठवड्यांच्या उच्चांकावर झेप घेतली होती. आणि 20-सप्टे-2022 रोजी 6, 876.50 रुपये च्या 52 आठवड्यांच्या नीचांकी कोमट पातळीवर पडला होता. मागील क्लोजिंग किमतीच्या आधारावर स्टॉक 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांसाठी एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग अॅव्हरेज (EMA) च्या वर ट्रेडिंग करताना दिसला आहे.
कंपनीबद्दल सविस्तर :
ही एक मिड-कॅप कंपनी असून, ZF ही एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी आहे. ही कंपनी औद्योगिक तंत्रज्ञान, व्यावसायिक वाहने आणि प्रवासी वाहनांसाठी सेवा पुरवण्याचे काम करते. कंपनीचे बाजार भांडवल 19,094.38 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.