3 May 2025 12:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Mumbai Metro Train | मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी करताना आरेतील एकही झाड तोडायचं नाही - मुख्यमंत्री

Mumbai Metro Train

मुंबई, ३० सप्टेंबर | दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वे (Mumbai Metro Train) डब्यांची चाचणी मरोळ मरोशी येथे केली जाणार आहे. ही चाचणी करताना आरेतील एकाही वृक्षाला धक्का लागू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

The Mumbai Metro Train from Colaba to SEEPZ will be tested at Marol Maroshi to ease traffic congestion in South Mumbai. Chief Minister Uddhav Thackeray has instructed not to hit any tree in Aarey during this test :

मुंबई येथील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाईन-३ चे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश येथे ८ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्या ठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे. प्रत्यक्षात याची चाचणी मुंबई येथे १० हजार किमी मेट्रो चालवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवरदेखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पध्दतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.

मरोळ मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू आहे. या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या कामाकरिता कोणतेही झाड तोडण्यात येणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

मागील 25 ते 30 वर्षात मुंबईचा झपाट्याने विकास झाला आहे. सिमेंटची जंगले उभी करण्यात आली आहेत. दुसरीकडे आता मुंबईत गृहनिर्मितीसाठी वा इतर विकास कामासाठी जागा नाही. अशावेळी मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे जंगलावर बिल्डर आणि सरकारची वक्रदृष्टी पडल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने करण्यात येत आहे. तर यातूनच आरेमध्ये मेट्रो कारशेड, एसआरए, राणी बाग विस्तारीकरणासह अनेक प्रकल्प आणण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली येथील जागेचा हळूहळू व्यवसायिक वापर करण्याचा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Mumbai Metro Train from Colaba to SEEPZ will be tested at Marol Maroshi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MumbaiMetro(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या