
Muthoot Finance Share Price Today | आर्थिक वर्ष 2022-23 संपला असून कंपन्यांची तिमाही निकाल आणि लाभांश वाटपाची लगबग सुरू झाली आहे. नुकताच ‘मुथूट फायनान्स’ या नॉन बँकिंग वित्तीय कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 22 रुपये म्हणजे दर्शनी किमतीवर 220 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. मात्र शेअर बाजारातील तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Muthoot Finance Limited)
लाभांश रेकॉर्ड तारीख :
‘मुथूट फायनान्स लिमिटेड’ कंपनीच्या संचालक मंडळाने सेबी ला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति इक्विटी शेअर 22 रुपये म्हणजेच दर्शनी किमतीवर 220 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 18 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. लाभांश घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत शेअर धारकांच्या खात्यात अंतरिम लाभांश जमा केला जाईल. ‘मुथूट फायनान्स’ कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी 0.28 टक्के वाढीसह 1,036.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
12 एप्रिल 2022 रोजी या कंपनीच्या स्टॉकने 1377 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 16 मार्च 2023 रोजी या कंपनीने 911.25 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत स्पर्श केली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 41,483 कोटी रुपये आहे.
स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
Tips2trades फर्मचे तज्ञ म्हणतात की, जरी ‘मुथूट फायनान्स’ कंपनीचे शेअर्स सध्या मजबूत दिसत असले तरी पुढील काळात त्यात प्रॉफिट बुकींग पाहायला मिळू शकते. म्हणून गुंतवणूकदारांनी सध्याच्या किंमत पातळीवर नफा बुक करून नुकसान टाळावे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.