4 May 2024 10:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Marine Electricals India Share Price Today | एका बातमीमुळे 40 रुपयाचा शेअर सुसाट तेजीत, गुंतवणुकीपूर्वी स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Marine Electricals India Share Price

Marine Electricals India Share Price Today | सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे शेअर बाजारात ट्रेडिंग बंद होती. मागील आठवड्यात गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘मरीन इलेक्ट्रिकल्स इंडिया’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. गुरुवारी हा स्टॉक 4.34 टक्के वाढीसह 40.85 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.25 टक्के घसरणीसह 40.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Marine Electricals India Limited)

मागील आठवड्यात कंपनीला मिळालेल्या नवीन ऑर्डरची बातमी आली होती, त्यामुळे शेअर्सची किंमत वेगात धावत होती. मात्र आज शेअरवर विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 42.85 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 25 रुपये होती.

‘मरीन इलेक्ट्रिकल्स इंडिया’ कंपनीने एलटी पॅनेलच्या पुरवठा आणि स्थापनेसाठी ‘इलेक्ट्रोमेक इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘लिसेनलाइट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या दोन कंपन्याकडून नवीन कंत्राट मिळवले आहेत. या प्रोजेक्टचे मूल्य 11.60 कोटी रुपये आहे. ‘मरीन इलेक्ट्रिकल्स इंडिया’ कंपनीला रेल्वे यार्डातील विद्युत संबंधित कामासाठी 6.32 कोटी रुपये मूल्याचा आणखी एक प्रोजेक्ट मिळाला आहे.

‘मरीन इलेक्ट्रिकल्स इंडिया’ कंपनीच्या शेअर्सनी मागील सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 30.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 23.44 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

कंपनीचे शेअरहोल्डिंग पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 74.46 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्याच वेळी कंपनीमध्ये सार्वजनिक भागीदारांनी 25.53 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 51,599.78 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Marine Electricals India Share Price Today on 17 April 2023.

हॅशटॅग्स

Marine Electricals India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x