30 May 2023 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Symphony Share Price | कुलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 3,00,000 टक्के परतावा दिला, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 30 कोटी, स्टॉक डिटेल्स Money Saving Tips | पैसे हाताशी थांबत नाहीत का? फॉलो करा या 8 टिप्स आणि आयुष्यातील आर्थिक बदल पहा शिंदे गट धोक्यात! आज निवडणूक झाल्यास शिंदे यांच्या शिवसेना गटाला केवळ 5.5% मते मिळतील, मनसे सर्वेतही शिक्कल नाही - सर्वेक्षण रिपोर्ट Adani Enterprises Share Price | 1 महिन्यात अदानी एंटरप्रायझेस शेअरने 32% परतावा दिला, अदानी स्टॉक तेजीत, ब्लॉकडीलची जादू काय आहे? Axita Cotton Share Price | सुवर्ण संधी! एक्झीटा कॉटन कंपनी 28 रुपयाचा शेअर 56 रुपयांना बायबॅक करणार, रेकॉर्ड डेटच्या आधी फायदा घ्या Bajaj Steel Industries Share Price | बजाज स्टील इंडस्ट्रीज शेअरने गुंतवणूकदारांना 1500 टक्के परतावा दिला, आता 60 टक्के लाभांश देणार Personal Loan | पर्सनल लोन घेताना या नकळत होणाऱ्या चुका टाळा, पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, जाणून घ्या
x

Nazara Technologies Share Price | झुनझुनवाला यांच्या पसंतीचा स्वस्त झालेला शेअर खरेदी करणार? तज्ञांनी टार्गेट प्राईस जाहीर केली

Nazara Technologies Share Price

Nazara Technologies Share Price | मागील बऱ्याच कालपासून ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनाक 28 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरणीसह 495.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ या कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील एका वर्षात 38.13 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. तर मागील 6 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 23.17 टक्के कमजोर झाले आहेत. ही कामगिरी पाहून या शेअरवर सट्टा लावणे, फायद्याचे आहे की नाही, असा प्रश निर्माण झाला आहे. (Nazara Technologies Limited)

स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
Tips2trade फर्म चे तज्ञ म्हणाले, ” कंपनीचे डेट टू इक्विटी गुणोत्तर खूपच कमी असून मागील काही तिमाहीत कंपनीच्या नफ्यात वाढ झाली आहे. जेव्हा ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचा IPO आला होता, तेव्हा तो खूप आकर्षक वाटत होता. कंपनीच्या ऑपरेटिंग मार्जिन मध्ये सुधारणा झाल्यास नवीन आर्थिक वर्षात कंपनीचे शेअर्स मजबूत परतावा देतील. गुंतवणूकदार ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 525 रुपये किमतीवर खरेदी करून 598 रुपये ते 635 रुपये लक्ष किमतीसाठी होल्ड करु शकतात”.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचा IPO 2021 लाँच करण्यात आला होता. ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या IPO 17 मार्च 2021 ते 19 मार्च 2021 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीने आपल्या IPO स्टॉकसाठी 1000 ते 1100 रुपये प्रति शेअर किंमत जाहीर केली होती. ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 30 मार्च 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 885 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 475.05 रुपये होती.

डिसेंबर 2022 च्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार दिवंगत गुंतवणुकदार रखेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे ‘नजारा टेक्नॉलॉजी लिमिटेड’ कंपनीचे 10 टक्के भाग भांडवल आहे. रेखा झुनझुनवाला यांनी आतापर्यंत 29 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nazara Technologies Share Price on 28 March 2023.

हॅशटॅग्स

#Nazara Technologies Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x