6 May 2025 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

Nestle India Share Price | ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 210 रुपये डिव्हीडंड देणार, फायदा घेणार?

Nestle India Share Price

Nestle India Share Price | ‘नेस्ले इंडिया’ या FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी मोठी खुशखबर जाहीर केली आहे. ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 27 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 21 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निर्धारित केला आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 19,500.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Nestle India Limited)

‘नेस्ले इंडिया’ कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 2023 या आर्थिक वर्षासाठी 27 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 मे 2023 रोजी शेअर धारकांच्या खात्यात हा अंतरिम लाभांश जमा केला जाईल. यासोबतच कंपनी 2022 सालचा अंतिम लाभांशही लवकरच वाटप करेल असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. 31 मे 2001 पासून आतापर्यंत ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने 66 लाभांश घोषित केले आहेत. मागील 12 महिन्यांत ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने प्रति शेअर 210 रुपये इतका इक्विटी लाभांश वाटप केला आहे.

डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल :
‘नेस्ले इंडिया’ कंपनीची डिसेंबर 2022 तिमाहीची विक्री 13.96 टक्के वाढीसह 4233.27 कोटीवर पोहचली होती. डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री 3714.86 कोटी रुपये होती. 2021 च्या तिमाही कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 2118.41 कोटी रुपये होता. जो मागील तिमाहीत 12.85 टक्के वाढीसह 2390.52 कोटी रुपयेवर पोहचला आहे. कंपनीने अद्याप आपले मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केलेले नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nestle India Share Price on 13 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nestle India Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या