 
						Network People Services Share Price | ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ या वित्तीय सेवा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 651.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 5 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 684 रुपये या आपल्या नवीन उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीने मजबूत कमाई केल्याने शेअर्समध्ये ही जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मार्च तिमाहीत कंपनीच्या नफ्यात 300 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे.
‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या तिमाही नफ्यात 337 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीने जानेवारी-मार्च 2023 तिमाहीत 6.52 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती तिमाही निकालात दिली आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 337.58 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे.
मागील वर्षी मार्च 2022 तिमाहीत या कंपनीने 1.49 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. या कंपनीने सहामाही आधारावर नफ्यात 549 टक्के वाढ नोंदवली आहे. या सोबत कंपनीने आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत 5.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत कंपनीने 0.87 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
एका वर्षात 830 टक्के परतावा :
‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 830 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नॉलॉजीज’ कंपनी सध्या कॅनरा बँक, केरळ ग्रामीण बँक, कर्नाटक ग्रामीण बँक, IBM इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कॉसमॉस को-ऑपरेटिव्ह बँक या सारख्या दिग्गज कंपन्यांना आपल्या सेवा प्रदान करते. कंपनीचा मासिक टर्न ओव्हर 60 कोटी आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		