 
						Neuland Laboratories Share Price | ‘न्यूलँड लॅबोरेटरीज’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची खरेदी पाहायला मिळत आहे. कंपनीने 10 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर करताच गुंतवणुकदार स्टॉकवर तुटून पडले आहेत. दीर्घ कालावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ‘न्यूलँड लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 2,573.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता कंपनीने तिमाही निकालासोबत लाभांश देखील जाहीर केला आहे.
लाभांश तपशील :
‘न्यूलँड लॅबोरेटरीज’ या फार्मा कंपनीने 11 मे 2023 रोजी मार्च तिमाहीच्या आर्थिक निकालांसह आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षासाठी कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर 10 रुपये म्हणजेच 100 टक्के अंतिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र लाभांश वाटपाला शेअर धारकांची मंजुरी मिळणे प्रलंबित आहे. ‘न्यूलँड लॅबोरेटरीज’ कंपनीने मार्च 2023 तिमाहीत 178 टक्क्यांच्या वाढीसह 84.51 कोटी निव्वळ नफा कमावला आहे. याच कालावधीत कंपनीचा स्टँडअलोन ऑपरेटिंग महसूल वार्षिक 59 टक्के वाढला आहे. तिमाही दर तिमाही काळात कंपनीने 51 टक्क्यांच्या वाढीसह 407.07 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
10949 टक्के परतावा कमावून दिला
न्यूलँड लॅबोरेटरीज कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना करोडोचा परतावं कमावून दिला आहे. 20 मार्च 1998 रोजी ‘न्यूलँड लॅबोरेटरीज’ कंपनीचे शेअर्स 23.26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक 2624.75 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 25 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10949 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 25 वर्षांत ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 89,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता करोडो रुपये झाले आहे.
अल्पावधीतही या स्टॉकने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट नफा मिळवून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 261.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील तीन वर्षांत गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 883 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील वर्षी 26 मे 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 965.85 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर मागील एका वर्षात शेअरची किंमत 177 टक्क्यांनी वाढून 2,672.05 रुपयेवर पोहचली आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		