
NHPC Share Price | शुक्रवार 13 डिसेंबर 2024 रोजी एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअर 0.41 टक्के वाढून 85.39 रुपयांवर पोहोचला होता. एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 118.40 रुपये होता, शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 58 रुपये होता. सध्या एनएचपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 85,825 कोटी रुपये आहे. (एनएचपीसी लिमिटेड कंपनी अंश)
कर्ज योजनेला कंपनी संचालक मंडळाने मंजुरी दिली
एनएचपीसी लिमिटेड कंपनी संचालक मंडळाने 2024-25 या आर्थिक वर्षात 6,900 कोटी रुपयांपर्यंत निधी उभारण्यासाठी सुधारित कर्ज योजनेला अधिकृत मंजुरी दिली आहे. एनएचपीसी लिमिटेड कंपनी संचालक मंडळाकडून घेण्यात आलेल्या या निर्णयात सुरक्षित किंवा असुरक्षित, करपात्र, रिडीमेबल, नॉन-क्युम्युलेटिव्ह, नॉन-कन्व्हर्टिबल कॉर्पोरेट बाँड्सद्वारे एक किंवा अधिक सिरीज किंवा खासगी प्लेसमेंटद्वारे हप्त्यांमध्ये निधी उभारण्याचा समावेश आहे.
एनएचपीसी लिमिटेड शेअरची टार्गेट प्राईस
टॉप ब्रोकरेज फर्म CLSA ने एनएचपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी आउटपरफॉर्म रेटिंग जाहीर केली आहे. CLSA ब्रोकरेज फर्मने एनएचपीसी कंपनी शेअरसाठी ५०९ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. CLSA ब्रोकरेज फर्मच्या मते, ‘आर्थिक वर्ष 24-29 दरम्यान हरित वाढीच्या संधी निर्माण होतील आणि हायड्रो सेक्टरमध्ये एनएचपीसी लिमिटेड कंपनीचा वाटा अधिक वाढेल.
एनएचपीसी शेअरने 257 टक्के परतावा दिला
मागील ५ दिवसात हा शेअर 1.78% घसरला आहे आहे. मागील १ महिन्यात एनएचपीसी शेअरने 9.25% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 16.04% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 31.27% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनएचपीसी शेअरने 257.28% परतावा दिला आहे. एनएचपीसी शेअरने लॉन्ग टर्म गुंतवणूकदारांना 142.24% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर एनएचपीसी शेअरने 29.09% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.