
NMDC Share Price | एनएमडीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. भारतातील सर्वात मोठ्या लोहखनिज उत्पादक एनएमडीसी कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत होते. आज मात्र या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ( एनएमडीसी कंपनी अंश )
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने एनएमडीसी स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी एनएमडीसी स्टॉक 0.38 टक्के घसरणीसह 211.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मोतीलाल ओसवाल फर्मने एनएमडीसी या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, एनएमडीसी स्टॉक अल्पावधीत 260 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. 28 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 202 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 29 टक्के नफा कमावून देऊ शकतो. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 42 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
ब्रोकरेज फर्मच्या मते, एनएमडीसी कंपनी 2025 पर्यंत 50 MT उत्पादन क्षमता साध्य करेल. या कंपनीच्या शेअर्सचे मूल्यांकन आकर्षक वाटत आहेत. आर्थिक वर्ष 2025-26 साठी हा स्टॉकचा EBITDA 4.5x आणि P/B 1.7x दराने वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मच्या मते, एनएमडीसी कंपनीचे शेअर्स मजबूत व्हॉल्यूम आउटलुक आणि स्टील क्षेत्राकडून मिळणारी मजबूत मागणीच्या जोरावर पुढील काळात 260 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.