2 May 2024 7:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Mcap of Top 10 Companies | टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचे मार्केट कॅप 1.03 लाख कोटींनी घटले | जाणून घ्या आकडेवारी

Mcap of Top 10 Firms

मुंबई, 13 फेब्रुवारी | गेल्या आठवड्यात सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये एकत्रितपणे 1,03,532.08 कोटी रुपयांची घट झाली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (Mcap of Top 10 Companies) सर्वाधिक फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 491.90 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी घसरला. पहिल्या 10 कंपन्यांमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल वाढले आहे.

Mcap of Top 10 Firms of Sensex has collectively declined by Rs 1,03,532.08 crore last week. Tata Consultancy Services (TCS) has suffered the most :

कोणाचे किती नुकसान :
* रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य 30,474.79 कोटी रुपयांनी वाढून 16,07,857.69 कोटी रुपये झाले. दुसरीकडे, TCS चे बाजार भांडवल 44,037.2 कोटी रुपयांनी घसरून 13,67,021.43 कोटी रुपये झाले.

* HDFC चे बाजार भांडवल रु. 13,772.72 कोटींनी घसरून रु. 4,39,459.25 कोटी/ हिंदुस्तान युनिलिव्हरचे बाजार भांडवल रु. 11,818.45 कोटींनी घसरून रु. 5,30,443.72 कोटी आणि ICICI बँकेचे बाजार भांडवल रु. 9,594.4 कोटी घसरून रु. 9,564.4 कोटी झाले.

* बजाज फायनान्सचे बाजार मूल्य रु. 8,987.52 कोटींनी घसरून रु. 4,22,938.56 कोटी आणि इन्फोसिसचे बाजारमूल्य रु. 8,386.79 कोटींनी घसरून रु. 7,23,790.27 कोटी झाले.

* गेल्या आठवड्यात, भारती एअरटेलला 3,157.91 कोटी रुपयांचा तोटा झाला आणि तिचे बाजार भांडवल 3,92,377.89 कोटी रुपयांवर आले. HDFC बँकेची बाजार स्थिती 2,993.33 कोटी रुपयांनी घसरून 8,41,929.20 कोटी रुपयांवर आली.

* त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे मूल्यांकन 803.21 कोटी रुपयांनी घसरून 4,72,379.69 कोटी रुपयांवर आले.

टॉप 10 कंपन्या :
टॉप 10 कंपन्यांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mcap of Top 10 Firms cos erodes by over Rs 1 lakh crore TCS biggest drag.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x