
Hot Stock | वित्तीय सेवा प्रदान करणारी स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला आहे. या कंपनीचे नाव आहे,”न्यासा सिक्युरिटीज लिमिटेड”. या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 15:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी प्रत्येकी 10 शेअर्सवर 15 बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आपल्या ग्राहक कंपन्यांना शेअर बाजार संबंधित वित्तीय सेवा प्रदान करते. याशिवाय Naysaa सिक्युरिटीज आपल्या ग्राहकाना आर्थिक सल्लागार म्हणूनही मार्गदर्शन करते.
बोनस शेअर्सचे प्रमाण :
Naysa Securities Limited कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 15:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यास मंजूरी दिली आहे. Nysaa सिक्युरिटीज कंपनीचे बाजार भांडवल 76.66 कोटी रुपये आहे. या कंपनीमध्ये प्रमोटरची गुंतवणूक हिस्सेदारी 46.92 टक्के आहे. कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 176.45 रुपये आहे.
न्यासा सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत यावर्षी 578 टक्के वाढली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 6 जानेवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 25.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 22 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 176.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात न्यासा सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 554 टक्के पेक्षा अधिक वर गेले आहेत. त्याच वेळी मागील एका महिन्यात कंपनीच्या स्टॉकची किंमत 30 टक्के वधारली आहे. या एकेकाळी या कंपनीच्या समभागांनी 176.45 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी गाठली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.