 
						Nykaa Share Price | नायका कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी खरेदी मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. काही महिन्यापूर्वी नायका कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. तर मागील काही आठवड्यापासून या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 191.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 1.39 टक्के वाढीसह 190.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
नायका कंपनीने नुकताच आपले डिसेंबर 2023 या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. शेअर बाजारातील तज्ञ नायका कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, नायका कंपनीचे शेअर्स काही महिन्यात 250 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. नायका कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 114.30 रुपये होती. नायका कंपनीची मूळ कंपनी FSN ई – कॉमर्स व्हेंचर्स आहे.
एचएसबीसी फर्मने नायका स्टॉकवर 250 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. एचएसबीसीने नायका स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे. नायका कंपनीच्या सौंदर्य प्रसाधन आणि पर्सनल केअरमधील निव्वळ विक्री वाढ पाहून HSBC ने नायका स्टॉकवर टारगेट प्राइस वाढवली आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शिअलच्या तज्ञांनी देखील नायका कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन 210 रुपये टारगेट प्राइस निश्चित केली आहे. नायका कंपनीचा IPO 1125 रुपये किमतीवर लाँच करण्यात आला होता.
नायका कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत बँड 1085 ते 1125 रुपये निश्चित केली होती. 10 नोव्हेंबर 2021 रोजी नायका स्टॉक 2001 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. या कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 5 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील 6 महिन्यांत नायका कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर अवघ्या सहा महिन्यात नायका स्टॉकची किंमत 139.45 रुपयेवरून वाढून 191.45 रुपये किमतीवर पोहोचली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		