
Nykaa Share Price | नायका कंपनीची मुळ कंपनी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 154.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड कंपनी अंश )
आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळत आहे. फॅशन आणि सौंदर्य प्रसाधन उत्पादने बनवणाऱ्या नायका कंपनीला नवीन स्पर्धकांकडून मजबूत आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. आज बुधवार दिनांक 20 मार्च 2024 रोजी नायका स्टॉक 0.72 टक्के घसरणीसह 152.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
नुकताच नायका कंपनीच्या प्रमुख फाल्गुनी नायर यांनी देखील कंपनीला दिग्गज कंपन्याकडून जबरदस्त स्पर्धेचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. रिलायन्स रिटेल कंपनीने एक नवीन ‘TIRA’ या नावाने एक ब्युटी सेक्टर रिटेल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. तर याच क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमध्ये टाटा क्लिक पॅलेट आणि Myntra कंपनी देखील सामील आहे. फाल्गुनी नायर यांनी नुकताच म्हंटले होते की, नायका कंपनीने भारतातील सौंदर्य प्रसाधन व्यवसाय लहान श्रेणीतून मोठ्या श्रेणीत नेण्यात मोठे योगदान दिले आहे.
नुकताच ब्रोकरेज फर्म नुवामा इन्स्टिट्यूशनने नायका कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस 192 रुपये निश्चित केली आहे. यासोबतच तज्ञांनी नायका स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. नायका कंपनीचा IPO 2021 साली 1125 रुपये किंमत बँडवर लाँच करण्यात आला होता. त्यानंतर हा स्टॉक 2000 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. नायका कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 5:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.