 
						Nykaa Share Price | नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजेच NSE ने आपल्या काही प्रमुख इंडेक्समध्ये नवीन अपडेट केली आहे. NSE ने नायका या फॅशन अँड ब्युटी सेगमेंटमध्ये व्यवसाय करणाऱ्या कंपनीला निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्समधून बाहेर केले आहे. या बदलाची अमलबजावणी 29 सप्टेंबर 2023 पासून केली जाणार आहे. ही बातमी प्रसिद्ध होताच, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी नायका स्टॉक विकायला सुरुवात केली.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के घसरणीसह 130 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी नायका कंपनीचे शेअर्स 0.75 टक्के घसरणीसह 132.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
निव्वळ नफ्यात 8 टक्क्यांची वाढ
FSN E-Commerce Ventures ही शेअर बाजारात सूचीबद्ध असलेली नायका कंपनी मुख्य कंपनी आहे. नायका कंपनीने नुकताच आपले जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले होते. नायका कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 8 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आणि कंपनीने 5.40 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत नायका कंपनीने 24 टक्के वाढीसह 1,421.80 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. जून तिमाहीत कंपनीचा एबिटा वार्षिक 60 टक्क्यांच्या वाढीसह 73.50 कोटी रुपयेवर पोहचला आहे. सध्या कंपनीचा एबिटा मार्जिन 5.2 टक्के आहे.
IPO शेअर बाजारात लाँच आणि सूचीबद्ध करण्यात आला
नोव्हेंबर 2021 मध्ये नायका कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच आणि सूचीबद्ध करण्यात आला होता. त्यावेळी शेअरची इश्यू किंमत 1125 रुपये जाहीर करण्यात आली होती. स्टॉक लिस्टिंगमध्ये नायका कंपनीच्या शेअर्सची किंमत 2000 रुपयांच्या पुढे गेली होती. नायका कंपनीचा IPO 2021 यावर्षातील सर्वात जास्त परतावा देणारा IPO होता. मात्र नंतर शेअरची किंमत घसरली आणि स्टॉक 90 टक्के स्वस्त झाला.
शेअर्स NSE निफ्टी इंडेक्समधून बाहेर
नुकताच NSE ने काही कंपन्यांचे शेअर्स निफ्टी इंडेक्समधून बाहेर काढले आहेत. त्यात नायका कंपनीच्या शेअर्स सोबत ACC, HDFC AMC, Indus Towers, 3nr, Page Industries, यांना निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्समधून बाहेर काढण्यात आले आहेत. आता त्याच्या जागी पंजाब नॅशनल बँक, श्रीराम फायनान्स, ट्रेंट, TVS मोटर, Zydus Lifescience हे शेअर्स सामील केले जाणार आहेत. 29 सप्टेंबर 2023 पासून निफ्टी 100 इंडेक्समध्ये देखील असे बदल पाहायला मिळतील. निफ्टी 100 मध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स सामील करण्यात आले आहेत. निफ्टी 500 इंडेक्समध्ये देखील बडल होणार असून 29 सप्टेंबर 2023 पासून त्यातून 18 कंपन्यांना वगळले जाणार आहे.
यामध्ये इंडियाबुल्स रिअल इस्टेट, महिंद्रा लॉजिस्टिक, हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, जिंदाल वर्ल्डवाईड, गोदरेज ऍग्रोव्हेट, या कंपन्यांचे शेअर्स बाहेर होतील. त्यांच्या जागेवर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, जिलेट इंडिया, ग्लेनमार्क लाइफ सायन्सेस, आलोक इंडस्ट्रीज, प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ, किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज, या कंपनीचे शेअर्स सामील केले जाणार आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		