 
						Nykaa Share Price Today | सौंदर्य प्रसाधन आणि फॅशन क्षेत्रातील भारतातील ई-कॉमर्स मार्केटप्लेस ‘नायका’ ची मूळ कंपनी ‘FSN ई-कॉमर्स व्हेंचर्स लिमिटेड’ च्या शेअर मध्ये उतरती कळा लागली आहे. बुधवार दिनांक 26 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 2.09 टक्के घसरणीसह 114.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Fsn E-Commerce Ventures Ltd)
कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये मोठे फेरबदल झाल्यानंतर शेअरमध्ये ही घसरण पाहायला मिळत आहे. खरं तर ‘नायका’ कंपनीने सोमवारी आपल्या व्यवस्थापन मंडळात अनेक नवीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती सेबीला दिली आहे.
शेअरची घसरगुंडी :
मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये नायका कंपनीच्या शेअरमध्ये 7.74 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. तर मागील एका महिन्यात हा स्टॉक 14.39 टक्के कमजोर झाला आहे. सौंदर्य प्रसाधन, पर्सनल केअर, फॅशन ब्रँड यासंबधित वस्तूंचे भारतातील सर्वात मोठे ऑनलाइन मार्केटप्लेस म्हणजे ‘नायका’ आहे. नायका कंपनीच्या पाच अधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानंतर स्टॉकवर प्रचंड विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.
आता नायका कंपनीने ‘राजेश उप्पलापर्ती’ यांना कंपनीत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. दरम्यान अभिषेक अवस्थी, ईश्वर परला, ध्रुव माथूर आणि अमित कुलश्रेष्ठ, यांना विद्यमान तंत्रज्ञान नेतृत्व संघात सामील करण्यात आल्याची माहिती कंपनीने सेबीला दिली आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
‘नायका’ कंपनीचा आयपीओ 2021 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. कंपनीने 10 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात पदार्पण केले होते. कंपनीने आपल्या IPO स्टॉकची किंमत बँड 1125 प्रति शेअर जाहीर केली होती. कंपनीचे IPO स्टॉक बंपर वाढीसह सूचीबद्ध झाले होते. मात्र मागील एका वर्षभरापासून या कंपनीच्या शेअरमध्ये मंदीचे वातावरण आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक 59 टक्के कमजोर झाला आहे. तर आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत हा स्टॉक 90 टक्के घसरला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		