
Olectra Greentech Share Price | ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ या इलेक्ट्रिक बस निर्माता कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्क्यांच्या वाढीसह 482.75 रुपये किमतीवर पोहचला होता. एका घोषणेमुळे ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ही वाढ पाहायला मिळाली. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Olectra Greentech Share Price | Olectra Greentech Stock Price | BSE 532439 | NSE OLECTRA)
कंपनीची हायड्रोजन बस लाँच :
‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनीने ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ सोबत भागीदारीत हायड्रोजन बस तयार केली आहे. ही हायड्रोजन बस पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या बसला कार्बनमुक्त पर्याय असेल. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती प्रसिद्ध केली आहे. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ ही प्रत्यक्षात ‘Megha Engineering & Infrastructure’ कंपनीची उपकंपनी म्हणून काम करते. ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ कंपनी भारतीय बाजारपेठेत नवीन पिढीची पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करत आहे.
कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, “नैसर्गिक संसाधनांमध्ये होणारी घट आणि वायू प्रदूषण, कार्बन उत्सर्जनाचे नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन, ऑलेक्ट्रा कंपनीने पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कंपनी वाहतूक व्यवस्था सुधारावी म्हणून हायड्रोजनवर चालणारी बस निर्माण केली आहे. कंपनीचा हा प्रयत्न भारत सरकारला कार्बन मुक्त हायड्रोजन उपक्रम साध्य करण्यास मदत करेल.
2000 साली स्थापन झालेली ‘ऑलेक्ट्रा ग्रीनटेक’ ही भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक बस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी मुख्यतः वीज पारेषण आणि वितरण नेटवर्कसाठी सिलिकॉन रबर आणि कंपोझिट इन्सुलेटर बनवणाऱ्या भारतातील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक मानली जाते. आणि आता कंपनीने हायड्रोजनवर चालणारी बस निर्माण केली आहे.
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरची कामगिरी :
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 738.35 रुपये आहे. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 374.10 रुपये आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 402.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 428 रुपयांवर ओपन झाला होता तर दिवसभराच्या व्यवहारात 482.75 रुपये उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. या कंपनीचे मल्टीबॅगर स्टॉक म्हणून ओळखले जातात, कारण मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 146 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.