Paytm Navratri Gold Offer | LPG बुकिंगवर मिळवा 10001 रुपयांचे सोने | कसे कराल बुकिंग

मुंबई, 0९ ऑक्टोबर | एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगवर पेटीएमने ग्राहकांसाठी बंपर ऑफर सुरु केली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याने ऐन सणासुदीच्या काळात ही ऑफर ग्राहकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. नवरात्रोत्सव काळात ही ऑफर सादर करण्यात आली आहे. ही ऑफर (Paytm Navratri Gold Offer) एलपीजीच्या तीन कंपन्यांवर उपलब्ध आहे- Indane, HP Gas आणि Bharat Gas. पेटीएम गॅस सिलिंडरच्या बुकिंगवर दररोज 10,001 रुपयांचे पेटीएम डिजिटल गोल्ड जिंकण्याची संधी देत आहे. नवरात्र काळात गॅस बुकिंग केलेल्या ग्राहकांपैकी 5 भाग्यवान ग्राहकांना कॅश प्राईजद्वारे रिव्हाड्स मिळतील.
Paytm Navratri Gold Offer. Paytm has launched a bumper offer for customers on LPG gas cylinder bookings. Due to the increase in the price of LPG gas cylinders, this offer will definitely be beneficial for the customers during the Ain festival. Paytm offers a chance to win Paytm Digital Gold at Rs 10,001 per day on booking of gas cylinders “
7 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या या ऑफरचा लाभ युजर्स 16 ऑक्टोबर पर्यंत घेऊ शकतात. या ऑफर अंतर्गत एलपीजी गॅस बुकिंगवर सर्व युजर्संना 1000 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक पॉईंट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर टॉप ब्रँडचे इतर डिल्स आणि रिव्हार्ड व्हाऊचर्स जिंकण्याची संधी या ऑफरमध्ये मिळणार आहे.
पैटीएम मधून गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स:
* पेटीएम अॅपमध्ये Recharge & Bill Payment मधील Gas Cylinder च्या आयकॉनवर क्लिक करा.
* गॅस सिलिंडर बुकिंग करण्यासाठी गॅस पुरवठादाराचे नाव सिलेक्ट करा.
* त्यानंतर एलपीजी कन्जुमर नंबर आणि एजन्सीचे नाव सिलेक्ट करा.
* मग गॅस बुकिंगचे पेमेंट पेटीएमद्वारे ऑनलाईन करा.
* नवरात्र काळात गॅस बुकिंग करणाऱ्या 5 भाग्यवान विजेत्यांना दररोज 10001 रुपयांचे पेटीएम गोल्ड मिळेल.
दरम्यान, 6 ऑक्टोबर रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 15 रुपयांनी वाढ करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात ही वाढ केल्याने याचा फटका नक्कीच सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यात पैटीएमने ही ऑफर सुरु करुन सर्व युजर्संना दिलासा दिला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Paytm Navratri Gold offer on LPG booking.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL