26 April 2024 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Penny Stocks | या स्वस्त शेअरच्या संयमी गुंतवणूकदारांची लॉटरीच लागली, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 3.85 कोटी परतावा, नाव सेव्ह करा

Penny Stock, Marico limited, Share price, BSE, NSE, stocks market news,

Penny Stocks | जर एखाद्या गुंतवणूकदाराने मूलभूत नियमांचे पालन करून शेअर बाजारात पैसे लावले तर तो भरघोस परतावा कमवू शकतो. बर्‍याच वेळा असे दिसून येते की शेअर बाजारात जे लोक दीर्घकाळासाठी पैसे लावतात, ते जबरदस्त नफा कमावतात. आज या लेखात आपण असाच एक स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा कमावून दिला आहे. या स्टॉकचे नाव आहे, मॅरिको लिमिटेड. या कंपनीच्या समभागांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मॅरिको लिमिटेड ही FMCG क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. सध्याच या कंपनीचे बाजार भांडवल 70,167.91 कोटी रुपये आहे. या शेअर्सच्या कामगिरीबाबत तज्ञ अतिशय सकारात्मक आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूकदार आणि तज्ञांनी या स्टॉक साठी 610 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे.

शेअर फक्त 2.81 रुपये किमतीवर होता :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या कंपनीच्या शेअरमध्ये 1.35 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. हा स्टॉक घसरून 542.05 रुपये खाली आला होता. 6 जुलै 2001 रोजी हा शेअर फक्त 2.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तेव्हापासून कंपनीच्या शेअरच्या किमतीत 19,190.04 टक्क्यांची जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. 2001 साली या शेअरमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती,तर तुम्हाला 2.81 रुपये हा बाजारभावाने 35,587 शेअर्स मिळाले असते. 22 डिसेंबर 2015 रोजी कंपनीने 1 शेअरवर 1 शेअर बोनस मोफत दिला होता. म्हणजेच, दीर्घकालीन गुंतवणूकदारांच्या समभागांची संख्या 71,174 पर्यंत वाढली असती. ज्या गुंतवणूकदाराने 2001 साली 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याला आता 3.85 कोटी रुपये परतावा मिळाला असता.

टार्गेट प्रेस आणि स्टॉप लॉस :
ICICI सिक्युरिटीजने मॅरिको स्टॉकसाठी 610 रुपये टारगेट प्राईस ठरवली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, हा स्टॉक 540 ते 547 रुपयांच्या दरम्यान खरेदी करणे फायद्याचे राहील आणि याचा स्टॉप लॉस 500 रुपये असावा. ब्रोकरेज फर्म ने आपल्या अहवालात म्हंटले आहे की “स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सला निफ्टीमध्ये आलेल्या अल्पकालीन तेजीचा थोडा फायदा झाला आहे. पुढील काळात मॅरिकोसारख्या शेअर्समध्ये आपल्याला जबरदस्त वाढ पाहायला मिळणार आहे. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

उच्चांकी आणि नीचांकी किंमत :
चालू वर्ष 2022 मध्ये मॅरिकोच्या स्टॉकमध्ये फक्त 5.44 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. हा कंपनीची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी किंमत 607.70 रुपये असून 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 455.65 रुपये होती. सरकारी संस्थानेही मॅरिकोमध्ये गुंतवणूक केलीली आहे. या कंपनीत सरकारची एकूण 0.09 टक्के गुंतवणूक आहे. जून 2022 पर्यंत परकीय गुंतवणूकदारांचा गुंतवणूक वाटा 25.16 टक्के होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks Of Marico Limited share price return on Investment on 26 September 2022

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x