Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा

Penny Stocks | स्मॉल-कॅप कंपनी पुनित कमर्शियल लिमिटेड कंपनीने आपल्या विद्यमान भागधारकांना बोनस शेअर्स वितरीत करण्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत रेकॉर्ड तारखेनुसार भागधारकांना 5:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत केले जातील असा प्रस्ताव पारित केला आहे. सध्या कंपनीचे शेअर्स 51.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोनस शेअरची घोषणा :
कंपनीने SEBI ला दाखल केलेल्या कागदपत्रात माहिती दिली आहे की पुनीत कमर्शियल लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 4 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आणि प्रस्ताव पारित करण्यात आले. तसेच संचालक मंडळाने आपल्या विद्यमान भागधारकांना 5:1 प्रमाणात बोनस शेअर वितरीत करण्याचा प्रस्ताव पारित केला. म्हणजेच कंपनी प्रत्येक एक इक्विटी शेअरमागे पाच बोनस इक्विटी शेअर्स मोफत देणार आहे. बोनस शेअर्स 03.12.2022 रोजी किंवा त्यापूर्वी दिले गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. तसेच कंपनीने आपले नाव “PUNEET COMMERCIALS LTD” वरून “EYANTRA VENTURES LIMITED” असे बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या शेअर्सबद्दल थोडक्यात :
पुनीत कमर्शियल लिमिटेड ही एक स्मॉल-कॅप कंपनी आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 1.23 कोटी रुपये आहे. कंपनी मुख्यतः हिऱ्यांचे उत्पादन, निर्यात आणि आयात अशा उद्योगात गुंतलेली आहे. 3 ऑक्टोबर 2022 रोजी पुनीत कमर्शियल लिमिटेडचे शेअर्स 51.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 27 ऑगस्ट 2018 पासून आतापर्यंत स्टॉकची किंमत 18.25 रुपये वरून 51.25 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत शेअर्समध्ये 180.82 टक्के वाढ झाली असून लोकांनी मल्टीबॅगर नफा कमावला आहे. या स्टॉकची किंमत 6 ऑक्टोबर 2020 रोजी 18.95 वरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 170.45 टक्केचा मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 126.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Penny Stock of Punit commercial share price return on investment on 7 October 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN