Penny Stocks | आजही चिल्लर भावात खरेदी करा हा पेनी शेअर, अल्पावधीत दिला 225 टक्के परतावा, किंमत 10 रुपये

Penny Stocks | GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 8 दिवसांपासून GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये 10.84 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोजी GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 4.81 टक्के वाढीसह 10.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जीव्हीके पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने स्टॉक वाढीचे कारण देताना म्हंटले आहे की, स्टॉक वाढीचे नेमकं कारण कंपनीला माहीत नाही, आणि स्टॉक वाढीमध्ये कंपनीने कोणतेही हस्तक्षेप केले नाहीये. मात्र सेबीने GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स निरीक्षणाखाली ठेवले आहे. जेव्हा एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये सतत वाढ होत असते, तेव्हा त्यामागे काहीतरी कारण असते. मात्र GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने स्टॉकमधील वाढीबाबत काही स्पष्ट माहिती नसल्याचे कळवले आहे.

GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेबीला कळवले होते की, कंपनीने संजीव कुमार सिंग यांना नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. याआधी GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सीएफओने 31 ऑगस्ट 2023 रोजी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पद त्याग केला होता. मागील 6 महिन्यांत GVK पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 383 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Penny Stocks of GVK Power & Infrastructure Share price 27 September 2023.