 
						Penny Stocks | किसान मोल्डिंग्ज कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 6 रुपयेवरून वाढून 70 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1,011 टक्क्यांनी वाढवले आहेत. ( किसान मोल्डिंग्ज कंपनी अंश )
मार्च 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स 6.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 70 रुपये किमतीवर पोहचला आहे. बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी किसान मोल्डिंग्ज स्टॉक 2 टक्के वाढीसह 70.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर क्लोज झाले होते.
मागील 4 महिन्यात किसान मोल्डिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 449 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मार्च 2024 या महिन्यात किसान मोल्डिंग्ज कंपनीचे शेअर्स 45.40 टक्के वाढले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 170 टक्के वाढले होते.
जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 19.60 टक्के वाढले होते. एप्रिल महिन्यात हा स्टॉक 15 टक्के मजबूत झाला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 दरम्यान किसान मोल्डिंग्ज स्टॉक विक्रीच्या दबावात अडकला होता. याकाळात शेअर्सची किंमत 18.5 टक्के घसरली होती.
किसान मोल्डिंग्ज लिमिटेड ही कंपनी मुख्यतः भारतातील पाणी व्यवस्थापन, सिंचन, पाणी वितरक, केबल डक्टिंग, पिण्याचे पाणी, नलिका विहिरी आणि सांडपाणी विल्हेवाट प्रणालीसाठी पाईप्स आणि फिटिंग्जचे उत्पादन विक्रीचा व्यवसाय करते. ही कंपनी क्लोरिनेटेड पॉलिव्हिनाईल क्लोराईड प्लंबिंग सिस्टीम, फ्री-फ्लो अनप्लास्टिकाइज्ड पॉलीव्हिनाईल क्लोराईड प्लंबिंग पाईप्स, कंपोझिट पाइपिंग सिस्टीम, माती, कचरा आणि पावसाच्या पाण्याचे पाईप्स आणि फिटिंग इत्यादीसाठी लागणारे विविध पाईप्स बनवते. या कंपनीची स्थापना 1982 साली मुंबईमध्ये झाली होती. नुकताच Apollo Pipes Limited कंपनीने किसान मोल्डिंग्ज लिमिटेड कंपनीचे 53.57 टक्के भाग भांडवल 118.40 कोटींमध्ये खरेदी केल्याची बातमी आली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		