9 May 2025 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

Penny Stocks | या मल्टिबॅगेर स्टॉकची किंमत 40 रुपये, 1 वर्षात गुंतणूकदारांचे पैसे तिप्पट केले, हा स्टॉक खरेदीसाठी नफ्याचा

Penny Stocks

Penny Stocks | सध्या शेअर बाजारात मोठी पडझड सुरू आहे,त्यामुळे बरेच शेअर्स स्वस्तात मिळत आहेत. जर तुम्ही या संधीचा फायदा घेऊ इच्छीत असाल तर, तर आम्ही तुमच्यासाठी एक मल्टीबॅगर स्टॉकची माहिती घेहून आलो आहोत. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत दुप्पट आणि तिप्पट गुणाकार केले आहेत. याशिवाय असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यात गुंतवणूक करून दीर्घकालीन भागधारकांनी 2000 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावला आहे.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने वर्ष-दर-वर्ष प्रमाणावर आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आपण ज्या कंपनी बद्दल चर्चा करत आहोत त्या कंपनीचे नाव”सोम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेड” असे आहे. जगात सध्या आर्थिक मंदी आणि महागाईची भीती पसरली असतानाही या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा मिळवून दिला आहे. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत या स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत.

स्टॉकमधील अप्रतिम वाढ :
सोम डिस्टिलरीज अँड ब्रेवरीज लिमिटेड या स्टॉक च्या किमतीत फक्त एका महिन्यात 97 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक मागील एका महिन्यापूर्वी जवळपास 97 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक आता 130 रुपयांपर्यंत गेला आहे. फक्त एका महिन्यात या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी 30 टक्क्यांहून अधिक परतावा कमावला आहे. मागील सहा महिन्यांत या स्टॉकमध्ये 70 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत वाढ पाहायला मिळाली आहे. या काळात गुंतवणूकदारांना 85 टक्के नफा झाला आहे. चालू वर्ष 2022 मध्ये हा स्टॉक 235 टक्‍क्‍यांनी वाढला असुन त्याची किंमत 40 रुपयांवरून 130 रुपयांपर्यंत गेली आहे.

अल्पावधीत भरघोस परतावा :
जर तुम्ही एका महिन्यापूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, आणि होल्ड करून ठेवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.30 लाख झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही या शेअरमध्ये सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणूकीचे मूल्य 1.85 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर तुम्ही 2022 च्या सुरुवातीला या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावून आतपर्यंत होल्ड केले असते तर, तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.35 लाख रुपये झाले असते.

या मल्टीबॅगर स्टॉकचे बाजार भांडवल 902 कोटी आहे. काल NSE वर या शेअर्सची ट्रेड व्हॉल्यूम 5.04 लाख होती. स्टॉकची सध्याची EPS 4 टक्केच्या वर आहे. मल्टीबॅगर ब्रुअरीचा स्टॉक 31.66 च्या PE मल्टिपलवर ट्रेड करत आहे, जो 71.41 च्या सेक्टर PE च्या निम्म्यापेक्षा कमी आहे. त्याची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 133.50 रुपये आहे. आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 35.15 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks of Som Distilleries & Breweries Limited share price return on investment on 08 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या