
Penny Stocks | शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड या कंपनीचा पेनी स्टॉक तुफान तेजीत आहे. शॉर्ट टर्ममध्ये श्रेष्ठ फिनवेस्ट शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करतोय. मागील अनेक दिवसांपासून श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड पेनी स्टॉक फोकसमध्ये आहे. गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी सुरु असल्याने श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी शेअर वारंवार अप्पर सर्किट हिट करतोय.
शेअरने एक महिन्यात 40 टक्के परतावा दिला
शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनी शेअर 5 टक्क्यांनी वाढून 0.84 पैशांवर पोहोचला होता. शुक्रवार, 27 डिसेंबरला श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनीच्या शेअरने ५ टक्क्यांनी वाढून 0.84 पैशांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. मागील एक महिन्यात श्रेष्ठ फिनवेस्ट शेअरने गुंतवणूकदारांना ४० टक्के परतावा दिला आहे. श्रेष्ठ फिनवेस्ट शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1.28 रुपये होता आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 0.49 रुपये होता. सध्या श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 138 कोटी रुपये आहे.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल
श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीने दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनीने दुसऱ्या तिमाहीत कामकाजातून ३.५७ कोटी रुपयांचा महसूल कमावला होता, जो आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत २.१० कोटी रुपये होता. या तिमाहीत श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा खर्च 19.37 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत 5.40 कोटी रुपये होता. श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनीचा निव्वळ तोटा मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील ३.२९ कोटी रुपयांवरून वाढून १४.८१ कोटी रुपयांवर पोहोचला होता.
श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनी स्टॉक स्लिट
या वर्षी जुलैमध्ये श्रेष्ठ फिनवेस्ट लिमिटेड कंपनी संचालक मंडळाच्या सदस्यांनी १:२ गुणोत्तरात स्टॉक स्लिटला मंजुरी दिली होती. 13 ऑक्टोबर 2016 रोजी श्रेष्ठ फिनवेस्ट कंपनी शेअर 1:5 च्या एक्स-स्प्लिट रेशोमध्ये व्यवहार करत होता.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.