
Penny Stocks | मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट विक्रीच्या मोडमध्ये आहे. मात्र, काही पेनी शेअर्स मजबूत तेजी असल्याचे दिसून (BOM: 511700) येत आहे. सध्या स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली. गुरुवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअर जवळपास 10 टक्क्यांनी वधारून 1.11 रुपयांवर पोहोचला. (स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी अंश)
1 वर्षात शेअरने 516.67% परतावा दिला
आता सोमवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअरवर नजर राहणार आहे. फेब्रुवारी 2024 रोजी शेअरचा भाव 3.52 रुपये होता. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 0.97 पैसे होता. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड या एनबीएफसी कंपनीने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 516.67% परतावा दिला आहे.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल
दुसऱ्या तिमाहीत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीला ०.५१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला २.३१ कोटी रुपये नफा झाला होता. तसेच दुसऱ्या तिमाहीत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा सेल ७१.३३ टक्क्यांनी वाढून ९.६८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत तो ५.६५ कोटी रुपये होता.
कंपनीची बैठक
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. 12 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत 6000 अनियमित, सूचीबद्ध नसलेल्या सुरक्षित एनसीडीच्या वाटपास स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीकडून मान्यता देण्यात आली आहे. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत प्रत्येकी एक लाख रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या ७००० अनरेटेड, अनलिस्टेड, सुरक्षित एनसीडी देण्यास मंजुरी दिली होती.
स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने सप्टेंबरमध्ये ग्रीन एनर्जी फंडिंगचा ही विस्तार केला. या अंतर्गत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीकडून भारतातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) मोबिलिटी सोल्यूशन्सला सपोर्ट देण्याच्या उद्देशाने व्यापक निधी उपक्रमाची घोषणा करण्यात आली. हा उपक्रम कंपन्यांना हरित ऊर्जा सोल्यूशन्स राबविण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करेल.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.