
Penny Stocks | मागील काही वर्षापासून केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची हालचाल दिसून येत आहे. बरेच स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना कमालीचा परतावा कमावून देत आहेत. मल्टीबॅगर स्टॉकच्या यादीत केमिकल सेक्टर मधील नवनवीन स्टॉकचा समावेश होत आहे. आज आपण ज्या केमिकल स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत, त्याचे नाव आहे, “विनती ऑरगॅनिक्स”. या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही वर्षात इतकी वाढ झाली आहे की, भागधारकांनी 156,659 टक्के पेक्षा अधिक नफा कमावला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी फक्त 1 लाख रुपये गुंतवले होते, ते गुंतवणुकदार सध्या करोडपती झाले असतील.
विनती ऑरगॅनिक्स लिमिटेड ही एक लार्ज-कॅप केमिकल कंपनी असून, विशेष रासायन निर्मिती उद्योगात गुंतलेली आहे. ह्या कंपनीचे बाजार भांडवल 21,435.20 कोटी रुपये आहे. भारतीय शेअर बाजाराच्या निरीक्षकांनी आणि तज्ञांनी विनती ऑरगॅनिक्स हा स्टॉक मल्टीबॅगर परतावा कमवून देत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. कंपनीने सूचीबद्ध झाल्यावर एकदा बोनस शेअर्स वितरीत केले होते, याचा फायदा गुंतवणूकदारांना झाला आणि आज करोडपती झाले आहेत.
विनती ऑरगॅनिक्सचा शेअर किमतीचा इतिहास :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजाराच्या कलोजिंग टाईम मध्ये, विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स BSE निर्देशांकावर 2085.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यापूर्वी शेअर्स 2009.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, जे सध्याच्या किमतीच्या तुलनेत 3.76 टक्के जास्त होते. 14 जुलै 1995 रोजी हा केमिकल स्टॉक 1.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ह्या स्टॉक मध्ये इतकी कमालीची वाढ झाली आहे, की मागील 27 वर्षांमध्ये ह्या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 156, 659.40.टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे.
24/02/2022 रोजी BSE निर्देशांकावर ह्या स्टॉक ने आपली 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 2,372.95 रुपये स्पर्श केली होती. त्याचवेळी ह्या स्टॉक ची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी किंमत 1,675.00 रुपये होती. BSE निर्देशांकावर उपलब्ध डेटानुसार, या कंपनीने 22 नोव्हेंबर 2007 रोजी आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात बोनस शेअर मोफत वितरीत केले होते.
गुंतवणुकीवर परतावा :
ज्या वेळी हा स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता, त्यावेळी हा शेअर 1.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. जर तुम्ही ह्या स्टॉक मध्ये सूचीबद्ध झाला त्यावेळी 1 लाख रुपये गुंतवले असते तर तुम्हाला एकूण 75,187 शेअर्स मिळाले असते. कंपनीने त्यांनंतर आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले, आणि गुंतवणूकदारांच्या शेअर्स ची एकूण संख्या 1,12,780 वर पोहोचली. सध्याच्या बाजारभावानुसार 1,12,780 शेअर्सची किंमत 2085.50 रुपये बाजारभावानुसार 23.52 कोटी रुपये झाली असती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.