30 April 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय?
x

Jai Balaji Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर! दर वर्षी हजारो टक्क्याने परतावा देतोय, खरेदी करणार?

Jai Balaji Share Price

Jai Balaji Share Price | जय बालाजी इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने मागील एका वर्षभरात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या एका वर्षभरात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 45 रुपयेवरून वाढून 900 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका वर्षात या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1953 टक्क्यांनी वाढवले आहे. ( जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनी अंश )

जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1307 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 42 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज स्टॉक 4.30 टक्के वाढीसह 831 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जय बालाजी इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः लोह आणि पोलाद संबंधित व्यवसाय करते. या कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 1 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 1 लाखाच्या गुंतवणूकीवर 20 लाख रुपये नफा दिला आहे. 24 मार्च 2023 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 44.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 922.95 रुपये किमतीवर पोहोचले होते.

जर तुम्ही 24 मार्च 2023 रोजी जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 20.53 लाख रुपये झाले असते. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 125 टक्क्यांनी वाढली आहे. मागील 6 महिन्यांत जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 409.50 रुपयेवरून वाढून 922.95 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

मागील 4 वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5563 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 16.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 मार्च 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 922.95 रुपये किमतीवर पोहोचले होते. मागील 3 वर्षात जय बालाजी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2397 टक्क्यांनी वाढवले आहेत. याकाळात कंपनीचे शेअर्स 36.95 रुपयेवरून वाढून 922.95 रुपये किमतीवर पोहचले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jai Balaji Share Price NSE Live 22 March 2024.

हॅशटॅग्स

Jai Balaji Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x