
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी BSE सेन्सेक्स इंडेक्स 0.32 टक्क्यांच्या घसरणीसह 64,941.08 अंकांवर ट्रेड करत होता. NSE निफ्टी इंडेक्समध्ये देखील 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 19,292.95 अंकांवर ट्रेड करत होता.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये यथार्थ हॉस्पिटल कंपनीच्या शेअरमध्ये आठ टक्क्यांची जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. तर टीसीएस कंपनीचे शेअर्स 1.32 टक्क्यांच्या कमजोरीसह ट्रेड करत होते. त्याच प्रमाणे विप्रो आणि एचसीएल टेक कंपनीमध्ये एक टक्क्यांपेक्षा जास्त पडझड पाहायला मिळाली होती.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, महिंद्रा अँड महिंद्रा, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया आणि एचडीएफसी बँक या सर्व कंपन्यांचे शेअर्स विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होते.
निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये 0.21 टक्क्यांची किंचित घसरण पाहायला मिळाली होती. निफ्टी स्मॉलकॅप इंडेक्समध्ये देखील 0.24 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. निफ्टी बँक इंडेक्स 0.09 टक्के कमजोरीसह ट्रेड करत होता. निफ्टी फायनान्शिअल इंडेक्स देखील लाल निशाणीवर ट्रेड करत होता.
भारतीय शेअर बाजारातील निफ्टी पीएसयू बँक, निफ्टी मीडिया आणि निफ्टी फार्मा इंडेक्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करत होते. निफ्टी आयटी, निफ्टी रियल्टी आणि निफ्टी एनर्जी इंडेक्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित मंदीच्या गर्तेत अडकले होते.
मात्र शेअर बाजारात विक्रीचा दबाव असूनही काही पेनी स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकले होते – Penny Stocks
* बोथरा मेटल
* दीक्षा ग्रीन्स
* अल्स्टोन टेक्सटाईल
* युनिवा फूड्स
* एकम लीजिंग
* एलांगो इंडस्ट्रीज
* ए टू झेड इन्फ्रा इंजिनिअरिंग
* केन्वी ज्वेल्स
* गुजरात स्टेट फायनान्शिअल
* GVK पॉवर
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.