12 December 2024 3:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे
x

Trent Share Price | टाटा ग्रुपचा छुपा रुस्तम शेअर! ट्रेंट शेअर्स जबरदस्त तेजीत, 1 महिन्यात 17 टक्के परतावा दिला, याआधी 435% परतावा दिला

Trent Share Price

Trent Share Price | भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव असला तरी टाटा समूहाचा भाग असलेल्या ट्रेंट कंपनीच्या शेअरमध्ये मागील आठ ट्रेडिंग सेशनपासून तेजी पाहायला मिळत आहे. 8 ऑगस्ट 2023 ते 17 ऑगस्ट 2023 दरम्यान ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.

मागील पाच वर्षांत ट्रेंट कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 435 टक्के नफा कमावून दिला आहे. पुढील काळात या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी तेजी पाहायला मिळू शकते, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी ट्रेंट कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 1,962.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काळात ट्रेंट कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 7-20 टक्के नफा कमावून देऊ शकतात. नुकताच या कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. 8 ऑगस्ट 2023 रोजी पासून या कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. ट्रेंट कंपनीने वेस्टसाइड आणि झुडिओ सारख्या रिटेल चेन चालवणाऱ्या ट्रेंट कंपनीने जून 2023 तिमाहीमध्ये 114.93 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील वर्षी एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत ट्रेंट कंपनीला 138.29 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. ट्रेंट कंपनीने जून तिमाहीत 2,808 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 46 टक्क्यांची वाढ झाली आहे. एंजेल वन फर्मच्या तज्ञांनी ट्रेंट कंपनीच्या शेअरमध्ये चढ-उतार होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ट्रेंट कंपनीचे शेअर्स सध्या BUY मोडमध्ये ट्रेड करत आहेत. पुढील कात या कंपनीच्या शेअरमध्ये 7 टक्के वाढ होऊ शकते. शेअरखान, अॅक्सिस सिक्युरिटीज आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी ट्रेंट कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. अनेक तज्ज्ञांनी ट्रेंट कंपनीच्या शेअरमध्ये बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काळात या कंपनीच्या शेअरमध्ये 12-20 टक्क्यांची वाढ होऊ शकते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Trent Share Price today on 19 August 2023.

हॅशटॅग्स

#Trent Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x