
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात अस्थरीता असतानाही साखर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स चांगली कामगिरी करत आहेत. चांगल्या व्हॉल्यूममुळे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साखर कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. साखर कंपनीच्या शेअर्समध्ये लोकांनी गुंतवणूक वाढवली असल्याने शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. राजश्री शुगर्स अँड केमिकल्स, मवाना शुगर्स, शक्ती शुगर, उगार शुगर वर्क्स, सिंभोली शुगर्स आणि बजाज हिंदुस्तान या कंपनीचे शेअर 20 टक्क्यांनी वाढले आहेत.
राजश्री शुगर्स अँड केमिकल्स, शक्ती शुगर्स लिमिटेड आणि सिंभोली शुगर्स या साखर कंपन्यांचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह व्यापार करत होते. राजश्री शुगर्स कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 55.60 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. शक्ती शुगर्स कंपनीच्या शेअर्समध्ये ही 20 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअर्स 28.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
शक्ती शुगर्स कंपनीच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. सिंभोली शुगर्स कंपनीच्या शेअर्समध्येही 20 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली होती, आणि शेअर्स 28.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बिझनेस स्टैंडर्डने जाहीर केलेल्या अहवालात म्हंटले आहे की, जानेवारी 2023 नंतर देशांतर्गत उत्पादनाचे मूल्यांकन केल्यानंतर भारत सरकार 2022-23 या चालू विपणन वर्षासाठी साखर निर्यातीचा कोटा वाढवू शकते.
या साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ :
नोव्हेंबर 2022 मध्ये भारत सरकारने 2022-23 विपणन वर्षासाठी 6 दशलक्ष टन साखर निर्यातीला मंजुरी दिली होती. 2021-22 या विपणन वर्षात भारताने विक्रमी 111 लाख टन साखर निर्यात केली होती. त्याच वेळी मवाना शुगर्स कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांच्या वाढीसह 99.40 रुपयांवर ट्रेड करत आहे. बजाज हिंदुस्थान कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 17.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून बजाज हिंदुस्थान कंपनीच्या शेअर्समध्येही कमालीची तेजी दिसून येत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.