 
						Penny Stocks | तानला प्लॅटफॉर्म ह्या कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आता जबरदस्त लाभांश मिळणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 6 रुपये लाभांश जाहीर केला आहे. यातील प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपये आहे त्यानुसार शेअर्स वर एकूण 600 टक्के लाभांश जाहीर झाला आहे.
कंपनीबद्दल सविस्तर – Tanla Platforms Share Price :
Tanla Platforms ही IT क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी असून मध्यम बाजार भांडवल आकाराची कंपनी आहे. कंपनीचे बाजार भांडवल10,187.02 कोटी रुपये आहे. तानला प्लॅटफॉर्म कंपनी जगभरातील क्लाउड कम्युनिकेशन्स सोल्यूशन्सच्या सर्वात मोठ्या सेवा प्रदात्यापैकी एक आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 6 रुपये लाभांश जाहीर केला आहे. यातील प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य फक्त 1 रुपये आहे, आणि लभांशाचे प्रमाण दर्शनी मुल्याच्या तुलनेत 600 टक्के आहे. कंपनीचा शेअर सध्या 748.50 रुपयेवर ट्रेड करत आहे.
कंपनीने काय म्हटले?
कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, “सेबीच्या नियमानुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने 04 ऑगस्ट 2022 रोजी झालेल्या बैठकीत, इतर गोष्टींबरोबरच, लाभांशावर चर्चा केली आणि घोषणा केली. 2022-23 आर्थिक वर्षासाठी 6 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. शेअर्स चे दर्शनी मूल्य प्रत्येकी 1 रुपये असून अंतरिम लाभांश प्रमाण 600 टक्के आहे. 19 ऑगस्ट 2022 रोजी अंतरिम लाभांशासाठी इक्विटी शेअर होल्डरची नावे निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे.
कंपनीच्या शेअर्सची किंमत :
तानला प्लॅटफॉर्मचे शेअर्स मागील शुक्रवारी दिवसा अखेर 748.50 रुपयावर बंद झाले होते. मागील बंदच्या तुलनेत 2.29 टक्के कमी. 5 वर्षांपूर्वी स्टॉकची किंमत 11 ऑगस्ट 2017 रोजी 30.30 रुपयांवर होती जी आता 5 ऑगस्ट 2022 रोजी 748.50 रुपयांपर्यंत वाढली आहे. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना 2,370.30 टक्के इतका जबरदस्त मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. मागील 1 वर्षात स्टॉकमध्ये 18.73 टक्के घसरण पाहायला मिळाली आहे. आणि वार्षिक दर वाढ आधारावर 2022 मध्ये आतापर्यंत स्टॉकमध्ये 59.30 टक्के घसरण झाली आहे. मागील 6 महिन्यांत स्टॉक ची किंमत 55.94 टक्के आणि गेल्या 1 महिन्यात स्टॉक ची किंमत 24.46 टक्के घसरली आहे. 17 जानेवारी 2022 रोजी NSE वर, स्टॉक 2,096.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत होता. आणि स्टॉक 27 जुलै 2022 रोजी 584.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. म्हणजेच, स्टॉक सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीच्या तुलनेत 64.30 टक्के खाली ट्रेड करत आहे. आणि 52 आठवड्याच्या निम्न पातळीपेक्षा 28.05 टक्के वर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		