13 December 2024 11:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Petrol Diesel Price | खनिज तेल स्वस्त होत असताना देखील नव्या भारतात पेट्रोल-डिझेल अजून महागलं

Petrol Diesel Price

मुंबई, 23 ऑक्टोबर | सणांच्या दिवसातही सामान्यांना दिलासा देण्यात आलेला नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढतील असेच निर्णय रोज सकाळी इंधन कंपन्यांकडून जाहीर होताना दिसतात. परिणामी (Petrol Diesel Price) महागाईचा डोंगर सुद्धा डोक्यावर कोसळत आहे.

Petrol Diesel Price. As per the rates announced by the petroleum companies on Saturday, the price of petrol in Mumbai has gone up by 30 paise to Rs 113.08 per liter. Diesel price has been hiked by 34 paise to Rs 103.97 per liter :

ओपेकमध्ये खनिज तेलाचा दर प्रतिबॅरल 86 डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. तो आता 85 डॉलर्सच्या खाली आला आहे. त्यामुळे भारतात इंधन स्वस्त होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून शनिवारी सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 30 ते 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.

पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 30 पैशांनी वाढून 113.08 रुपये इतका आहे. तर डिझेलच्या दरात 34 पैशांची वाढ झाल्यामुळे एका लीटरसाठी 103.97 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 107.24 आणि 95.98 रुपये इतका आहे.

तुम्ही SMS’च्या मदतीने रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तपासू शकता. पेट्रोल-डिझेलचे दर दररोज पहाटे 6 वाजता बदलत असतात. इंडियन ऑइलच्या संकेतस्थळानुसार RSP सोबत तुमच्या शहराचा CODE नंबर टाइप करून 9224992249 या क्रमांकावर तुम्हाला SMS पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा कोड निरनिराळा असतो. BPCL ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि HPCL ग्राहक HPPrice असं टाईप करून 9222201122 या क्रमांकावर SMS पाठवून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाणून घेऊ शकतात..

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Petrol Diesel Price as on 23 October 2021 checkout updated rates.

हॅशटॅग्स

#Petrol Price(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x