26 April 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर
x

Paytm Gets SEBI Nod For IPO | बहुचर्चित पेटीएम आयपीओला सेबीची मंजुरी | गुंतवणूकदारही उत्सुक

Paytm Gets SEBI Nod For IPO

मुंबई, 23 ऑक्टोबर | पेटीएम’ची मूळ कंपनी असलेल्या One97 Communications ला आयपीओ’साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डाची (SEBI) अधिकृत मान्यता मिळाली आहे. कंपनी नोव्हेंबरमध्ये ऑफर लाँच करण्याची शक्यता (Paytm Gets SEBI Nod For IPO) आहे, असं या प्रक्रियेत व्यस्त असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Paytm Gets SEBI Nod For IPO. Digital financial services company Paytm has received approval from market regulator SEBI for an initial public offering (IPO) of Rs 16,600 crore. The company is expected to hit the stock market later this month. It is considering reducing share sales to get listed faster before the IPO :

सरकारी मालकीच्या कोल इंडियाने 2010 मध्ये उभारलेल्या रु. 15,000 कोटीला मागे टाकणारा हा IPO देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा असणार आहे. IPO मध्ये रु. 8,300 कोटींच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इश्यू आणि ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे.

ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, भागधारक अँट फायनान्शियल, अलिबाबा, एलिव्हेशन कॅपिटल V, सैफ III मॉरिशस, Svf पँथर (केमन) आणि Bh इंटरनॅशनल होल्डिंग्स हे सर्व OFS द्वारे त्यांच्या शेअर्सचा काही भाग ऑफलोड करण्याचा विचार करत आहेत. पेटीएमने जुलैमध्ये सेबीकडे DRHP दाखल केला होता.

पेटीएम आयपीओ करण्यासाठी ज्या बँकांना शॉर्टलिस्ट करण्यात आले, त्यात मॉर्गन स्टॅन्ले, सिटीग्रुप इंक यांचा समावेश आहे. JPMorgan Chase & Co समाविष्ट आहेत. त्यापैकी मॉर्गन स्टेनलीचा दावा सर्वात मजबूत आहे. दरम्यान, पेटीएम 1.47-1.78 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनाची मागणी करीत आहे. अमेरिकास्थित मूल्यमापन तज्ञ अश्वथ दामोदरन यांनी कंपनीच्या सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सचे मूल्य 2,950 रुपये प्रति शेअर केले.

पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा गेल्या एक वर्षापासून महसूल वाढवण्यात आणि पेटीएमच्या सेवांवर कमाई करण्यात गुंतलेत. स्टार्टअपने आपला व्यवसाय डिजिटल पेमेंटच्या पलीकडे बँकिंग, क्रेडिट कार्ड, वित्तीय सेवा, संपत्ती व्यवस्थापन आणि डिजिटल वॉलेटमध्ये वाढवला. पेटीएमने फोनपे, गुगल पे, अॅमेझॉन पे आणि व्हॉट्सअॅप पे या आव्हानाचा यशस्वीपणे सामना केला. देशातील व्यापारी पेमेंटमध्ये त्याचा सर्वात मोठा बाजार हिस्सा आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Paytm Gets SEBI Nod For IPO for to launch India’s biggest IPO.

हॅशटॅग्स

#IPO(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x