
Piccadily Agro Share Price | पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने नुकताच आपले डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने 192 कोटी रुपये विक्रमी महसूल संकलित केला आहे. कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत निव्वळ नफ्यात 322.5 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या नेत्रदीपक तिमाही निकालानंतर पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 332.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या ‘Indri Diwali 2023 Edition’ ला मागील वर्षी जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली होती. अवघ्या सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.85 लाख रुपये झाले आहे.
11 जुलै 1997 रोजी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 25 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 332.50 रुपये किमतीवर पोहोचला आहे. याकाळात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,32,900 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील 5 दिवसात पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 7.71 लाख रुपये नफा दिला आहे. पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 38.70 रुपये होती. आहे.
पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, डिसेंबर तिमाहीत पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीने मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 55.89 टक्के महसूल वाढ साध्य केली आहे. पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने निवेदन जाहीर केले की, “डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीने साध्य केलेली असाधारण वाढ आणि मजबूत कामगिरी ही कंपनीच्या टीमच्या समर्पण आणि कठोर परिश्रमाचा पुरावा आहे. तसेच ऑपरेशनल एक्सलन्स हा कंपनीच्या वचनबद्धतेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे”.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.