
Piccadily Agro Share Price | पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. ( पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनी अंश )
या कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकदारांना 2,38927 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवार दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 430.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
फेब्रुवारी 2003 मध्ये पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 18 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी 2003 साली या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 23 कोटीपेक्षा जास्त झाले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3825 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.
मार्च 2021 मध्ये पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 10.9 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 430.25 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 45.35 रुपयेवरून 849 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 या वर्षात पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 56 टक्के वाढले आहेत.
मार्च 2024 मध्ये पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 16 टक्क्यांनी कमजोर झाला होता. एप्रिल 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 42 टक्क्यांनी वाढले आहेत. फेब्रुवारी 2014 मध्ये या कंपनीचे शेअर्स 21 टक्क्यांनी आणि जानेवारी 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी मजबूत झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 45.20 रुपये होती. MarketsMojo फर्मने सध्या पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सवर ‘Buy’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.