 
						Pidilite Share Price | पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात ट्रेड कर होते. शुक्रवारी पिडीलाइट इंडस्ट्रीज स्टॉक लाल निशाणीसह 2431 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.24 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2796 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 2250 रुपये होती.
या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी पिडीलाइट इंडस्ट्रीज स्टॉक 0.88 टक्के घसरणीसह 2,435.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
13 मार्च 2009 रोजी पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 6000 टक्के वाढला आहे. आता पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनी दक्षिण भारतात कर्ज वितरणाचा व्यवसाय सुरू करणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीने भारतात सजावट आणि रंगकामाच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. पिडीलाइट इंडस्ट्रीज ही कंपनी प्रसिद्ध फेविकॉल बनवणारी कंपनी आहे.
आता ही कंपनी दक्षिण भारतात लघु कर्ज वितरणाचा व्यवसाय सुरू करणार आहे. पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीने माहिती दिली की, त्यांनी नॉन-बँकिंग वित्तीय सेवा प्रदान करणारी कंपनी पारग्रो इन्व्हेस्टमेंट 10 कोटी रुपयेला खरेदी केली आहे. Pargrow ही कर्जमुक्त कंपनी 31 मार्च 2024 पूर्वी पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीला हस्तांतरित केली जाईल.
पिडिलाइट इंडस्ट्रीज ही कंपनी मागील काही काळापासून आपल्या प्रस्थापित व्यवसायात विविधता आणण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओरिसा राज्यात पेंट व्यवसाय सुरू केला आहे. सध्या ही कंपनी पायलट प्रोजेक्ट म्हणून पेंट व्यवसाय चालवत आहे.
यासह कंपनीने वूड फिनिशपासून, अॅडेसिव्ह आणि पेंट्स यासर्व सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. वुड फिनिशच्या कामासाठी, पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीने इटलीच्या Industria Cheemia Advika Spa कंपनीसोबत 50:50 भागीदारीनुसार संयुक्त उपक्रम सुरू केला आहे.
पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीने सध्या सुरुवात म्हणून आपल्या कॉन्ट्रॅक्टर नेटवर्कमध्ये 100 कोटी रुपये मूल्याचे वितरीत करून कर्ज वितरणाचा व्यवसाय सुरू केला आहे. पुढील 2 वर्षांत, पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनी या व्यवसायाचा विस्तार करु इच्छित आहे. पिडीलाइट इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या डीलर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्सना लघु कर्ज वाटप करून आणि त्यांची भांडवलाची पूर्तता करून या व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		