PPF Scheme | होय! PPF मध्ये SIP करून नियमित बचतीतून मोठा फंड कसा तयार करावा? स्कीमची पूर्ण डिटेल पहा

PPF Scheme | काळानुसार गुंतवणुकीचे माध्यम ही बदलत चालले आहेत. सध्या गुंतवणुकीचे असे पर्याय उपलब्ध आहेत, जे आपण कधी ऐकले देखील नाही. सध्या गुंतवणूक बाजारात म्युच्युअल फंड एसआयपी चा जास्त बोलबाला आहे. परंतु म्युचुअल फंड स्कीम ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे यात नेहमी पैसा बनेल हे शाश्वत नाही. जर तुम्हालाही म्युच्युअल फंड SIP गुंतवणूक जोखमीची वाटत असेल तर तुम्ही सरकारी योजनेत गुंतवणूक करू शकता. इंडिया पोस्ट ऑफिस तर्फे अनेक योजना राबवल्या जातात. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे जमा करु शकता. या योजनेत दर महिन्याला छोटी रक्कम जमा करून दीर्घ काळात तुम्ही चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा कमवू शकता आणि मोठा फंड तयार करू शकता. ही योजना काही प्रमाणात म्युचुअल फंड SIP सारखीच आहे, फक्त यात SIP एवढी जोखीम नाही. ही योजना तुमचे पैसे अनेक वाढवण्याची kshmta राखते. चला तर मग जाणून घेऊ ही स्कीम डिटेलमध्ये
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना :
PPF ही भारत सरकारच्या सुरक्षा हमी अंतर्गत राबवली जाणारी गुंतवणूक योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक 7.1 टक्के दराने चक्रवाढ व्याज परतावा दिला जाईल. पीपीएफ स्कीममध्ये एका वर्षात किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करण्याची परवानगी असते. या योजनेत, तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनप्रमाणेच PPF मध्येही दरमहा एक ठराविक रक्कम जमा करू शकता. तुम्ही PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. ही योजना भविष्यात तुम्हाला खूप मोठा फंड तयार करून देऊ शकते. या योजनेत तुम्ही गुंतवणुकीचा कालावधी 5-5 वर्षासाठी वाढवू शकता. या योजनेचा आणखी एक फायदा म्हणजे या योजनेतील गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याज रकमेवर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागणार नाही.
PPF योजनेचे फायदे :
ही योजना तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम बचत आणि गुंतवणूक करण्याची संधी देते. PPF मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम जमा करण्याची गरज नाही. PPF खात्यात एका आर्थिक वर्षात तुम्ही कमाल दीड लाख रुपये जमा करू शकता. ही योजना तुम्हाला एका वर्षात 12 हप्त्यांमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देते. तुम्ही तुमच्या 10 वर्षांवरील मुलांच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकता. PPF योजनेचा परिपक्वता कालावधी 15 वर्ष असून तुम्ही हा कालावधी पुढे दर 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. PPF योजनेत गुंतवणूकीला सुरुवात केल्यास 3 वर्षानंतर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता. PPF योजनेंतर्गत तुम्हाला आयकर कायदा कलम 80C अंतर्गत कर सवलत देखील दिली जाते.
मासिक 10,000 गुंतवणुकीवर परतावा :
जर तुम्ही PPF योजनेत दरमहा 10 हजार रुपये जमा करण्याचे ठरवले तर 1 वर्षात तुमची एकूण गुंतवणूक 1.20 लाख रुपये जमा होईल. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज परतावा दिला जाईल. 15 वर्षांत तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक रक्कम 18 लाख रुपये जमा होईल. आणि 7.1 टक्के चक्रवाढ व्याजदराने तुम्हाला 14.54 लाख रुपये व्याज परतावा मिळेल. 15 वर्षांनी योजनेच्या मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम 32.55 लाख रुपये असेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| PPF Scheme for Long term investment and earn huge returns on 1 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल