4 December 2024 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY NTPC Green Share Price | मालामाल करणार NTPC ग्रीन शेअर, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी - NSE: NTPCGREEN SIP Mutual Fund | ढीगभर पैसा जमा करायचा आहे मग, 'या' गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या नाहीतर सगळंच गमावून बसाल Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
x

PPF Scheme | या योजनेत दररोज फक्त 100 रुपयांची गुंतवणूक करून 10 लाख रुपयांचा परतावा मिळवा, परताव्यावर सरकारी हमी

PPF scheme

PPF Scheme | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच PPF योजना ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक जबरदस्त पर्याय मानली जाते. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे, कारण या योजनेचा बाजारातील जोखमीशी कोणताही संबंध नसतो. सर्व करदात्यांसाठी हा गुंतवणुकीचा एक जबरदस्त पर्याय मानला जातो. कारण PPF मधील गुंतवणुकीवर कर सवलत मिळते. पीपीएफ आणि योजनेच्या मॅच्युरिटीवर मिळणारे व्याज देखील करपात्र नाही.

पीपीएफ आपल्याला दीर्घकालीन गुंतवणुकीची संधी देते. जे लोक नोकरी करत नाहीत किंवा ज्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, ते ईपीएफओच्या कक्षेत येत नाहीत. या सर्वांसाठी पीपीएफमध्ये गुंतवणूक करणे सोयीचे असते. असंघटित क्षेत्रात काम करणारे लोक. त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय म्हणून सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेची निवड करू शकतात.

दररोज फक्त 100 रुपये गुंतवून मिळतील 10 लाख :
जर तुम्ही दररोज फक्त 100 रुपये गुंतवणूक केली, तर एका वर्षात तुमची गुंतवणूक रक्कम 36500 रुपये होईल. सध्या पीपीएफमधील गुंतवणुकीवर 7.1 टक्के व्याज परतावा मिळत आहे. जर तुम्ही 15 वर्षे या योजनेत गुंतवणूक करत राहिलात आणि व्याजदर 7.1 टक्के इतका मिळत राहिला, तर 15 वर्षानंतर तुम्हाला 9.89 लाख रुपये परतावा मिळेल. 15 वर्षात दररोज 100 रुपये गुंतवले तर तुमचे एकूण गुंतवणूक मूल्य 547500 रुपये होईल. आणि गुंतवणूकदाराला या जमा केलेल्या भांडवलावर 442431 रुपये व्याज परतावा मिळेल. योजनेच्या मॅच्युरिटीवर मिळणारा ह्या सर्व पैशावर कोणताही आयकर भरावा लागत नाही. पीपीएफ खात्यात दरवर्षी कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात.

या योजनेत मिळतात तीन जबरदस्त फायदे :
पीपीएफमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला तीन प्रकारचे अतिरिक्त कर लाभ मिळतील. प्रथम, गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला कोणताही आय भरावा लागणार नाही. दुसरे म्हणजे या योजनेतील गुंतवणुकीवर मिळालेले व्याज देखील आयकर मधून करमुक्त असेल. तिसरे म्हणजे, योजनेच्या मॅच्युरिटीवर मिळालेली रक्कम देखील करमुक्त असते. 15 वर्षांचा काळ पूर्ण झाला की नंतर तुम्ही खाते बंद करू शकता. मॅच्युरिटीनंतर, योजनेतील सर्व संपूर्ण पैसे तुमचे असतात, तुम्हाला ते परत केले जातात. ही रक्कम तुम्ही तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरू शकता. योजनेची मुदतपूर्ण झाल्यावर परतावा बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एक अर्ज सबमिट करा लागेल. फॉर्ममध्ये पीपीएफ आणि बचत खात्याचा तपशील दिलेला असतो. अर्जासह, तुम्हाला मूळ पासबुक आणि कॅन्सल केलेला चेकही सबमिट करावा लागतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF scheme for long term investment and huge benefits on 14 September 2022.

हॅशटॅग्स

#PPF Scheme(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x