
Precision Wires Share Price | आठवड्याचा शेवटचा दिवस शेअर गुंतवणूकदारांसाठी फार निराशाजनक गेला. आज शेअर बाजाराची सुरुवात हिरव्या निशाणीवर झाली, बाजार लाल निशाणीवर बंद झाला. आज बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पहायला मिळाला. अशा अस्थिर काळात जर तुम्ही गुंतवणूक करण्यासाठी मजबूत स्टॉक शोधत असाल, आज या लेखात आम्ही तुम्हाला एका जबरदस्त शेअरबद्दल माहिती देणार आहोत, त्यावर तुम्ही बाजी लावू शकता. शेअर बाजारातील अनेक दिग्गज तज्ञांनी ‘प्रिसिजन वायर्स’ कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अल्प मुदतीसाठी त्यात गुंतवणूक केल्यास मजबूत फायदा होऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. शेअर बाजारातील तज्ञ वायर आणि केबल्स क्षेत्रातील स्टॉक्सबाबत उत्साही पहायला मिळत आहे. (Precision Wires Limited)
शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी ‘प्रिसिजन वायर्स’ या कंपनीचे शेअर्स 64 रूपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील 3 वर्षात ‘प्रिसिजन वायर्स’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 475 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘प्रिसिजन वायर्स’ हा मल्टीबॅगर स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. ‘प्रिसिजन वायर्स’ कंपनीचे शेअर्स आज 64 रूपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ज्ञांनी हा स्टॉक 75 ते 90 रूपये पर्यंत वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला आहे.
कंपनीची मूलभूत तत्त्वे :
‘प्रिसिजन वायर्स’ कंपनीचा स्टॉक 16 च्या पीई मल्टिपलवर ट्रेड करत असून त्याचा EPS 18-19 टक्के आहे. मागील 5 वर्षांत कंपनीच्या नफ्यात सरासरी 22-23 टक्के वाढ झाली असून कंपनीचा सेल्स देखील 24-25 टक्के वाढला अबे. ‘प्रिसिजन वायर्स’ कंपनीचे बाजार भांडवल 3000 कोटी रुपये आहे. याशिवाय कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 60 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. परकीय गुंतवणूकदारांनी कंपनीचे एकूण 1 ते 1.25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. अल्प काळासाठी या स्टॉक मध्ये पैसे लावून मजबूत कमाई करता येऊ शकते, असे तज्ञ म्हणतात.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.