
Premier Explosives Share Price | प्रीमियर एक्सप्लोसिव्हज या कंपनीच्या शेअरमधील तेजी पाहून तुम्ही ही थक्क व्हाल. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरमध्ये एवढी तेजी होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला 552.26 कोटी रुपये मूल्याची वर्क ऑर्डर मिळाली आहे. भारतीय संरक्षण मंत्रालयाने प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली आहे. (Premier Share Price)
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 588.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 708.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील :
प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, भारतीय हवाई दलाकडून कंपनीला मोठी वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. या वर्क ऑर्डर अंतर्गत प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीला फ्लेअर्स पुरवठा करायचा आहे. रडारला गोंधळात टाकण्यासाठी चाफ आणि फ्लेअर्स वापरले जातात. लष्करी विमाने मजबूत बनवण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.
प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीला ही ऑर्डर 12 महिन्यांत पूर्ण करावी लागणार आहे. या आदेशापूर्वी प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून आणखी 76.78 कोटी रुपये मूल्याचे काम देण्यात आले होते. या शिवाय कंपनीला बूस्टर धान्य पुरवठ्यासाठी 9.73 कोटी रुपये मूल्याची आणखी एक ऑर्डर मिळाली होती.
कंपनीची कामगिरी :
या वर्षी म्हणजेच अवघ्या सहा महिन्यात प्रीमियर एक्सप्लोसिव्हज कंपनीच्या शेअरची किंमत 78.55 टक्के वाढली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 58.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 136.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 68.77 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.