28 April 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
x

Axis Mutual Fund SIP | बँक किंवा पोस्ट ऑफिस पेक्षा ही म्युच्युअल फंड योजना SIP तून 28 लाख रिटर्न देतेय, नाव नोट करा, पैसा वाढवा

Axis Mutual Fund SIP

Axis Mutual Fund SIP | सध्याच्या काळात आपल्याकडे गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. म्युच्युअल फंड हा असाच एक गुंतवणूक पर्याय आहे, जो गुंतवणूकदारांना दीर्घकाळात भरघोस परतावा कमावण्याची संधी देतो. म्युचुअल फंड हा एक अतिशय सोपा आणि सरळ गुंतवणूक पर्याय म्हणून लोकप्रिय झाला आहे. आज या लेखात आम्‍ही तुम्हाला अशा एका म्युचुअल फंड स्‍कीमची माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत अप्रतिम परतावा मिळवून दिला आहे. यासोबतच म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करून लोकांना कर सवलत लाभही मिळतो. आपण ज्या म्युच्युअल फंड योजनेची चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे, “अ‍ॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड”.

अ‍ॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड ही एक ओपन-एंडेड इक्विटी म्युचुअल फंड स्कीम आहे. या म्युचुअल फंड योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे प्रामुख्याने स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लावले जातात. 29 नोव्हेंबर 2013 रोजी अॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड इन्व्हेस्टमेंट या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. ही म्युचुअल फंड स्कीम सुरू होऊन आता 9 वर्षे उलटून गेली आहेत. व्हॅल्यू रिसर्च फर्मने या म्युच्युअल फंड योजनेला 5 स्टार रेटिंग देऊन बिनधास्त गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. मॉर्निंगस्टारने या म्युचुअल फंडला 4 स्टार रेटिंग दिली आहे. या म्युच्युअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक सरासरी 23.18 CAGR परतावा मिळवून दिला आहे.

अल्पावधीत मजबूत परतावा :
मागील एका वर्षात या म्युचुअल फंड स्कीमने आपल्या गुंतवणूकदारांना 8.28 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. या प्रकरणात, 10,000 रुपयांची गुंतवणूकीवर 10,828 रुपये परतावा मिळाला आहे. मागील तीन वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, या म्युचुअल फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 27.71 टक्के CAGR परतावा दिला आहे. या प्रकरणात, तीन वर्षांपूर्वी जर तुम्ही यात 10,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर तुम्हाला 20,845 रुपये फायदा झाला असता.

दुसरीकडे, पाच वर्षांपूर्वी ज्या लोकांनी 10,000 रुपयांची गुंतवणूक केली होती, त्याची गुंतवणूक वाढून 24,680 रुपये झाली आहे. या परिस्थितीत लोकांनी गेल्या पाच वर्षात 23.18 टक्के CAGR परतावा कमावला आहे. त्याच वेळी, ज्या लोकांनी या म्युचुअल फंडाच्या सुरुवातीला 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 63,180 रुपये झाले आहे.

SIP मध्ये गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
अ‍ॅक्सिस स्मॉल कॅप म्युचुअल फंड योजनेने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना SIP च्या माध्यमातून सरासरी वार्षिक 20.77 टक्के परतावा कमावून दिला आहे. अशा परिस्थितीत, 10,000 रुपयांच्या मासिक एसआयपी गुंतवणुकीद्वारे 8 वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक 10.70 लाख रुपये झाली असती. 8 वर्षात तुम्हाला SIP मध्ये गुंतवणूक केल्यास 28 लाख रुपयांचा परतावा मिळाला असता.

दुसरीकडे, जर आपण एका वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर SIP गुंतवणुकीवर या म्युचुअल फंडने आपल्या गुंतवणूकदारांना 9.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. या प्रकरणात, 1.20 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1.26 लाख रुपयांचा परतावा मिळाला आहे. त्याच वेळी, तीन वर्षांच्या कालावधीत या म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना सरासरी वार्षिक 30.85 टक्के परतावा मिळाला आहे. या प्रकरणात 3.60 लाखा रुपये गुंतवणुकीवर एकूण 5.59 लाख रुपये परतावा मिळाला आहे. मागील 5 वर्षात या म्युच्युअल फंड स्कीमने आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 25.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. अशा परिस्थितीत 6 लाखाच्या गुंतवणूकीवर लोकांनी 11 लाख रुपये परतावा मिळवला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Axis Mutual Fund Small Cap Fund SIP return on investment benefits on 16 November 2022.

हॅशटॅग्स

Axis Mutual Fund SIP(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x