
Premier Explosives Share Price | प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. मागील 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2.5 पट वाढवले होत. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 21 पट वाढली आहे. ( प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनी अंश )
जानेवारी 2024 पासून आतापर्यंत प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 116 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रीमियर एक्सप्लोझिव्ह स्टॉक 3.04 टक्के घसरणीसह 622.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सोमवारी प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटसह 675.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढले होते. जून 2021 मध्ये या कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले होते. त्यावेळी कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपयेवरून कमी होऊन 2 रुपयेवर आले होते.
गेल्या सहा महिन्यांत प्रीमियर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अडीचपट परतावा कमावून दिला आहे. 5 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 276 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 189.99 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 909.35 रुपये होती.
जर तुम्ही पाच वर्षापूर्वी प्रीमियर एक्सप्लोझिव्ह कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 21 लाख रुपये झाले असते. ऑगस्ट 2019 मध्ये या कंपनीचे शेअर्स 32 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 622 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.